दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवार २१ जुलै रोजी तहलका (Tehelka) मासिक, तरुण तेजपाल आणि इतर दोघांना मानहानीच्या प्रकरणात निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी मेजर जनरल एमएस अहलुवालिया यांना २ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल २२ वर्षांनी दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
सन २००२ मध्ये तहलका (Tehelka) मॅगझिनने एक ‘ऑपरेशन वेस्ट एंड’ नावाचे स्टिंग ऑपरेशन केले होते. यामधून त्यांनी निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी मेजर जनरल एमएस अहलुवालिया यांच्यावर संरक्षण सौद्यांमध्ये लाच घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मेजर अहलुवालिया यांनी तहलका मासिक, त्यातील पत्रकार तरुण तेजपाल आणि इतर दोघे तसेच ही बातमी झी टीव्ही यांनी दाखवल्यामुळे त्यांच्यावरही मानहानीचा दावा केला होता. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी दिल्ली उच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे.
[BREAKING] Delhi High Court orders Tehelka, Tarun Tejpal, Aniruddha Bahal and Mathew Samuel to pay ₹2 crore to former Army Officer Major General MS Ahluwalia for defaming him in 2001 sting operation
report by @prashantjha996 https://t.co/kjRDSrRg8j
— Bar & Bench (@barandbench) July 22, 2023
(हेही वाचा – Devendra Fadnavis : परिपक्व राजकारणी)
निवृत्त मेजर जनरल एम एस अहलुवालिया हे त्यावेळी भारतीय लष्करात आयुध विभागाचे महासंचालक होते. प्रोपगंडा पोर्टलने स्टिंग ऑपरेशन (Tehelka) प्रकाशित केल्यानंतर, सीबीआयने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (पीसीए) कलम 9 आणि 10 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community