पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार, १२ फेब्रुवारी रोजी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील दिल्ली-राजस्थान दरम्यानचा पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. त्याला २४ तास होत नाही तोच या महामार्गावर अपघात झाला आहे. भंडारेज जवळ दोन वाहनांची धडक झाली. या अपघातात एक युवक जखमी झाला. जखमी युवकाला दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच हा अपघात झाल्याने महामार्गावरील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या गुणवत्तेबद्दल बोलायचे तर, 3 प्राण्यांच्या अंडरपाससह हा आशियातील पहिला एक्स्प्रेसवे आहे. तसेच या एक्स्प्रेसवेवर प्रदूषण कमी करण्यासाठी 10 लाखांहून अधिक रोपे लावली जात आहेत. राजस्थानचे सात जिल्हे दिल्ली मुंबई एक्स्प्रेसवने जोडले जात आहेत. यामध्ये अलवर, भरतपूर, दौसा, सवाईमाधोपूर, टोंक, बुंदी आणि कोटा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर हा एक्स्प्रेसवे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला अधिक शक्तिशाली बनविण्याचे काम करेल. तसेच, मालगाड्यांसाठी येथे बनवलेला 550 किलोमीटरहून अधिक मार्ग राजस्थानमध्ये आहे. त्यामुळे राजस्थान थेट गुजरात आणि महाराष्ट्राच्या बंदरांशी जोडले जाईल. त्यामुळे राजस्थानमध्ये उद्योग उभारणे सोपे होणार आहे.
(हेही वाचा सीझनच्या आधीच मुंबईत हापूस आंब्याची विक्रमी आवक)
Join Our WhatsApp Community