केरळनंतर देशाच्या राजधानीत Monkeypox ची एन्ट्री! ३१ वर्षीय युवकाला संसर्ग

जगभरात कोरोना महामारीचे थैमान घातल्यानंतर आता मंकीपॉक्स विषाणूचे नागरिकांची चिंता वाढवली आहे. केरळ नंतर देशाची राजधानी दिल्लीतही मंकीपॉक्सने एन्ट्री केल्याचे समोर आले आहे. दिल्लीत मंकीपॉक्सचा 31 वर्षीय पहिला रूग्ण आढळला असून त्याला दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रूग्णावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णाने कोणताही परदेश प्रवास केला नसून या रुग्णाला ताप आणि त्वचेच्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुणे रेल्वे स्थानकाचा भार होणार कमी! कारण…)

देशात मंकीपॉक्सचा संसर्ग वेगाने पसरत असताना मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण दिल्लीत आढळल्याने आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली असून, दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट केले असून दिल्लीत एका रुग्णाला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता देशात मंकीपॉक्स रूग्णांचा आकडा चारवर पोहोचला आहे. यापूर्वी आढळलेले तीनही रूग्ण हे केरळमधील होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.  जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस यांनी आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली.

ही आहेत मंकीपॉक्सची लक्षणे 

तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here