अमेरिकेत ह्युस्टन या ठिकाणी मायकल डेल (DELL) नावाच्या मुलाचा जन्म झाला. मायकल (Michael DELL) लहानपणापासूनच खूप जिज्ञासू आणि हुशार होता. मायकलचे (Michael DELL) शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पालकांनी बायोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी त्याला टेक्सास इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून दिलं. मायकलच्या पालकांना वाटायचं की, मायकलने खूप शिकावं आणि मोठा डॉक्टर व्हावं. पण आपल्याकडे म्हण आहे ना, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’. मायकलचंही असंच काही झालं त्यावेळेस.. (DELL)
वयाच्या दहाव्या वर्षांपासून मायकलने (Michael DELL) आपल्याला मिळणाऱ्या खर्चाच्या पैशातून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती (DELL) . या इन्व्हेस्टमेंटमधून पुढच्या दोन वर्षांमध्ये मायकलची दोन हजार डॉलर एवढी सेव्हिंग जमा झाली. एवढंच नाही तर मायकल चौदा वर्षांचा होईपर्यंत त्याची महिन्याची कमाई त्याच्या शाळेतल्या शिक्षकांपेक्षाही जास्त होती. (DELL)
मायकल पंधरा वर्षांचा (DELL) असताना त्यांच्या वडिलांनी बायोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी त्याला एक कंप्युटर आणून दिला. पण मायकलला बायोलॉजीपेक्षा कंप्युटर (computer) कसा काम करतो या गोष्टीतच जास्त रस होता. पुढे वर्षभरातच मायकल बायोलॉजीच्या अभ्यासाला कंटाळला. एक दिवस त्याने आपल्या कंप्युटरचे सगळे पार्ट्स अगदी काळजीपूर्वक वेगळे केले आणि कंप्युटर (computer) कशाप्रकारे काम करतो ते बघायला लागला. खरंतर त्याच्या पालकांना त्याचं असं वागणं अजिबात आवडलं नाही. पण मुलाच्या हट्टासमोर ते बिचारे पालक काय करणार होते. (DELL)
त्यानंतर त्याने आणखी एक दुसऱ्या कंपनीचा कंप्युटर (computer) विकत आणला आणि त्याचंही तेच झालं. दुसरा कंप्युटरसुद्धा (DELL) मायकलने उघडला आणि त्याचा अभ्यास करायला लागला. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणतात ते उगाच नाही. अखेर मायकलच्या प्रयत्नांना यश मिळालं. त्याला कंप्युटरची संपूर्ण कार्यप्रणाली कशाप्रकारे काम करते ते समजलं. कंप्युटर्स बनवणाऱ्या नामवंत कंपन्यांपैकी एक डेल (DELL) कंपनीच्या सुरुवातीचा पाया रचला गेला होता.
मायकलने युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असतानाच पोस्टाची तिकिटं आणि वर्तमानपत्र विकून काही प्रमाणात रक्कम जमा केली होती. ते पैसे त्याने आपला नवीन कंप्युटर (computer) तयार करण्यासाठी वापरायचे असं ठरवलं. युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या राहत्या खोलीत त्याने वेगवेगळे पार्ट्स आणून कंप्युटर (computer) तयार करायला सुरुवात केली आणि त्याला त्याच्या प्रयत्नांचं फळही मिळालं. मायकल कंप्युटर तयार करण्यात सफल झाला. त्याने कुठल्याही दुकानांत न जाता परस्पर ग्राहकांनाच कंप्युटर विकायला सुरू केली. याचा फायदा ग्राहकांनाही झाला. कारण त्यांना बाहेरच्या दुकानातल्या कंप्युटरच्या किंमतीपेक्षा स्वस्त कंप्युटर मायकल तयार करून देऊ लागला. (DELL)
पुढे मायकलने (Michael DELL) ग्राहकांच्या गरजेनुसार कंप्युटर बनवायला सुरुवात केली. त्याने तयार केलेल्या कंप्युटरचा चांगला खप व्हायला लागला. त्याने आपल्या कंपनीच नाव ‘पीसीज लिमिटेड’ असं ठेवलं. हळूहळू मायकलच्या ग्राहकांची संख्या वाढायला लागली. त्यावेळेस मायकल फक्त सत्तावीस वर्षांचा होता. मायकलने आपल्या कंपनीचं नाव बदलून ‘डेल कंप्युटर कॉर्पोरेशन’ असं ठेवलं. (DELL)
मायकलच्या (Michael DELL) डेल कंपनीने जगभरातल्या व्यवसायविश्वात आपले पाय रोवले. पहिल्या वर्षात कंपनीने सहा मिलियन डॉलरची विक्री केली. पण दुसऱ्याच वर्षी या आकड्यात आश्चर्यकारक बदल घडून आला. कंपनीचा टर्न ओव्हर चौतीस मिलियन डॉलरपर्यंत वाढला. १९८७ सालपर्यंत डेल ही जगभरातील नामवंत कंपन्यांपैकी एक कंपनी झाली. सुरुवातीच्या आठ वर्षांमध्ये डेल कंपनीने अप्रतिम बिझनेस करून जगावर आपली छाप पाडली. (DELL)
इंटरनेट आल्यानंतर डेल (DELL) कंपनीने ऑनलाइन विक्रीदेखील सुरू केली. आजच्या घडीला डेल कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर पाच कोटी डॉलर एवढा आहे.
Join Our WhatsApp Community