भांडुप पश्चिम क्वारी रोड येथील जलवाहिनी वारंवार फुटल्याने होणारी जलगळती लक्षात घेता ही जलवाहिनी बदलण्याचा रेंगाळलेला प्रस्ताव त्वरित मंजूर करत नागरिकांना न्याय देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली.
पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे
अनिल गलगली यांनी आयुक्तासहित जल अभियंता यांस पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मागील 12 दिवसांत जलवाहिनी फुटल्याने घाटकोपर, भांडुप, कांजूर आणि विक्रोळी भागात पाणीपुरवठा झालेला नाही. सहाय्यक अभियंता जलकामे (बांधकाम) यांच्या मार्फत काम प्रगतीपथावर असून त्याकरिता पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. अजूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. 900 MM GRP जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रेंगाळला असून याबाबत आता निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करत गलगली म्हणतात की, वारंवार गळतीमुळे नागरीकांना त्रास तर सहन करावा लागतो आणि महापालिकेचे नुकसानही होत आहे.
(हेही वाचा …तर श्रीकांत शिंदे राजन विचारेंविरोधात लढणार?)
Join Our WhatsApp Community