शौर्य दिनाचे औचित्य साधून भगूरमध्ये वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

163

भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने वीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात जहाजातून मारलेल्या साहसी उडीला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारत सरकारने वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी भगूरमध्ये करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज व वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अनुक्रमे श्रीराम कातकाडे व ह.भ.प. गणेश महाराज करंजकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सावरकर स्मारकात विक्रम सोनवणे, कैलास भोर व प्रसाद आडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी खूप जुनी आहे, परंतु आता आम्ही भगूरयेथून पुनश्च भारतरत्न देण्याची मागणी करत आहोत असे गणेश महाराज करंजकर यांनी सांगितले.

वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ज्या व्यक्तींनी आपले आयुष्य वेचले आहे, खर्ची घातले आहे त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची आहुती या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात दिली त्या स्वातंत्र्यवीरांना ७५ वर्षानंतर देखील अजूनही दुर्लक्षितच ठेवण्यात आले आहे. सावरकरांचे वैचारिक विरोधक गेल्या कित्येक वर्षांपासून सावरकरांचा इतिहासच जनतेसमोर येऊ देत नव्हते. आता जसजसा जनतेस इतिहास समजायला लागला तसतशी स्वातंत्र्यवीरांची महती सर्वांना जाणवायला लागली आहे आणि स्वातंत्र्यवीर हे त्या काळातील किती अजब रसायन होते हे देखील समजायला लागले आहे. त्यांच्या एवढा प्रचंड त्याग, त्यांनी सहन केलेल्या मरण यातना याची कोणीही बरोबरी करू शकत नाही, हे सर्वश्रुत असून देखील अजूनही त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर करण्यात येत नाही ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना चीड आणणारी गोष्ट ठरत आहे. स्वातंत्र्यवीरांनी अथांग समुद्रात मारलेल्या जगप्रसिद्ध उडीस ११२ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना ‘भारतरत्न’ मिळायलाच पाहिजे. असे अनेक जण असा युक्तिवाद करतात की ते भारत नाही, तर विश्वरत्न आहेत परंतु यासाठी सर्वप्रथम आपल्या देशाने त्यांचा सन्मान करायला हवा. असेही करंजकर यांनी सांगितले.

New Project 15

( हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण)

यावेळी मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, संभाजी देशमुख,काकासाहेब देशमुख, आशिष वाघ, मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, संदेश बुरके, भूषण कापसे, विजय घोडेकर, सुनिल जोरे, श्रुती करंजकर, प्रमोद घुमरे, भूपेश जोशी, आकाश नेहेरे, ओम देशमुख, दादासाहेब देशमुख, गणेश राठोड , निलेश हासे आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.