लग्नात वधूपित्याकडून हुंडा घेणे हा वरपक्षासाठी आपला सामाजिक दर्जा उंच दाखविण्याचाच प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. या प्रकाराला गेल्या दोन-तीन वर्षांत बराच झटका बसला. आता अनेक वरपक्षांना मुली शोधाव्या लागत आहेत. अशातच आता हुंड्याची अट घातली जाताना दिसत नाही. हुंडा नको, परंतु किमान चैनीच्या व भौतिक वस्तू द्या, अशी मागणी वर पक्ष करीत असल्याने वधूपित्याला महागाईचा फटका बसत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, हुंडा घेणाऱ्यांची संख्या तुलनेने घटली असली तरी नवऱ्या मुलाला फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन आदी वस्तू देण्याची मागण्यांची चढाओढ दिसत आहे. या वस्तूंच्या किमती यंदा महागल्याने वधूपित्याचा खर्च वाढला आहे. परिणामी या महागाईचा फटका वधूपित्याला बसला आहे.
(हेही वाचा – यासीन मलिकने न्यायालयात दिली कबुली; म्हणाला, ‘होय, मी दहशतवादी…’)
…म्हणून वधूपित्याला बसतोय फटका
हुंड्याची प्रथा मागे पडत असली, तरी वस्तूंच्या स्वरूपात देण्या-घेण्याची पद्धत समाजात रूढ होतांना दिसतेय. टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीनसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंची मागणी आणि त्याची चर्चा वरपक्ष लग्न जुळण्याआधीपासूनच करताना दिसतेय. गेल्या दोन वर्षांत या वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने त्याचा आर्थिक फटका वधूपित्याला मोठ्या प्रमाणात बसत आहे.
हुंडा नाही तर या साहित्यांची होतेय मागणी
वरपक्षाकडून वधूपित्याकडे मागितल्या जात आहे अशा वस्तू
- बेड,
- फ्रीज,
- कूलर,
- टीव्ही,
- वॉशिंग मशीन,
- गॅस शेगडी
- विविध प्रकारच्या वस्तू
- सुखी संसारासाठी या भौतिक व चैनीच्या वस्तू आवश्यक असल्याचे सांगून मागणी आग्रहाने धरली जात आहे.