महाबळेश्वरमधील पॉइंट्सची नावे बदलणार?

देशासह अवघ्या जगाला भुरळ टाकणारे सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. या पर्यटनस्थळाला उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतुंमध्ये पर्यटकांची गर्दी असते, आजही पावसाळ्यात धबधबे बघण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वरमध्ये गर्दी केली आहे. अशा महाबळेश्वरमधील पॉइंट्सला ब्रिटिशांनी नावे दिली आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आता या पर्यटन स्थळातील ब्रिटिशांची ओळख पुसून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येथील तब्बल २४ पॉईंटची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी आधीपासून होत होती, आता ही मागणी हिंदू एकता आंदोलन समितीने लावून धरली आहे.

या पॉइंट्सची बदलणार नावे

ऑर्थरसिट, विल्सन पाँईंट, लॉडविक पाँईंट, लेस्ली विल्सन पाँईंट, केटस् पाँईंट, एलिफन्ट हेड, निडल होल पाँईंट, बेबींन्टन पाँईंट, इको पाँईंट, बाँम्बे पाँईंट, लिंग मळा वॉटर फाँल पाँईंट, किंग चेअर पाँईंट, विंडो पाँईंट, इको पाँईंट हन्टिंग पाईंट, टायगर स्प्रिंग पाँईंट, कॅसल रॉक पाँईंट, मंकी पाईंट पाँईंट, मरजोरी पाँईंट, कॅटस पाईंट पाँईंट, मिडल पाँईंट, सनसेट पाँईंट, प्लॅटो पाँईंट, वेण्णालेक पाँईंट, पारसी पाँईंट.

महाबळेश्वरचा थोडक्यात इतिहास 

1819 मध्ये मराठा साम्राज्याचे पतन झाल्यानंतर ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या आसपासच्या डोंगरांना साताऱ्याच्या जिल्ह्याला जोडले. ब्रिटीश शासकांना हील स्टेशन्समध्ये इंग्लंडसारखे वातावरण हवे होते, हे लक्षात घेऊन युरोपीयन वनस्पती स्टाँबेरी महाबळेश्वरमध्ये लावल्या आणि लायब्ररी, थेटर, बोटिंग, तलाव, क्रिडांगणे या सारख्या सुविधा विकसित केल्या गेल्या.

महाबळेश्वरचे वैशिष्ट्य

महाबळेश्वर हे समुद्र सपाटीपासून सुमारे 4500 फुटापेक्षा जास्त उंचीवर असलेले थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरमध्ये प्रत्येक वर्षी 15 लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात. महाबळेश्वरात 12 महिने पर्यटकांची रेलचेल सुरु असते. महाबळेश्वरवासियांचा संपूर्ण व्यवसाय हा पर्यटकांवर आवलंबून आहे. महाबळेश्वरातील दऱ्याखोऱ्यांमधील निसर्ग हा पर्यटकांना आकर्षित करत असतो. महाबळेश्वरात बाराही महिने थंडी जाणवते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here