छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणा-या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाला सुरुवात झाली आहे. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात येत आहे.
अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकामावरुन अनेकदा वाद झाले आहेत. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडावे अशी शिवप्रेमींची मागणी होती. तसेच इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगण्यात येत होता त्यावरुनदेखील अनेकदा वाद झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा सील करण्यात आला होता.
( हेही वाचा: भ्रष्ट लोक देशाला उद्ध्वस्त करत आहेत; सर्वोच्च न्यायालयाची कडक शब्दात टिप्पणी )
पोलीस बंदोबस्त तैनात
न्यायालयाने हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. मात्र गुरुवारी पहाटे 5:30 वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या हे काम सुरु असून मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. तसेच, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community