केंद्रातील मोदी सरकारने 2016 मध्ये नोटाबंदीच्या काळात जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. यानंतर 500 ची नवी नोट आणि 1000 च्या ऐवजी 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. मात्र आता दोन हजारांच्या नोटा चलनात आणून काय फायदा? असा सवाल उपस्थित करत भाजपचे खासदार सुशील मोदी यांनीही याच मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
(हेही वाचा – ‘…दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही’; पूनम महाजनांंचं राहुल गांधींवर टीकास्त्र)
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटेवर बंदी घातली पाहिजे, असे सुशील मोदी म्हणाले. तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, त्यांनी देशात 2000 रूपयांच्या नोटांच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला आणि काळा पैसा म्हणून नोटा साठवल्या जात असल्याचा आरोप केला. फेब्रुवारीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते की, बँकांना 2000 रूपयांच्या नोटा देणे बंद करण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सोमवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटांचा गुन्हेगारी कारवाया आणि अवैध व्यापारात मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे सरकारने या नोटा टप्प्याटप्प्याने बंद केल्या पाहिजेत.
काय म्हणाले भाजपचे खासदार
2016 साली काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. मात्र या निर्णयाने भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले होते. ज्या कारणासाठी ही नोटबंदी झाली होती. त्याचा उद्देश सफल होऊ शकलेला नाही. या नोटेमुळे काळ्या पैशात वाढ होत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून 2 हजारांची नोट छापली जात नाही, त्यामुळे ही नोट बंद करण्यात यावी, असेही भाजप खासदाराने सांगितले.
पुढे ते असेही म्हणाले की, ज्या लोकांकडे दोन हजार रूपयांच्या नोट आहेत, त्यांनी बँकेकडून त्या दुसऱ्या चलनात बदलून घ्याव्यात कारण काही काळानंतर या नोटा चलनातून पूर्णतः बाद होतील. जगातील विकसित देश आहेत ज्यामध्ये अमेरिका, जपान, चीन यांसारख्या देशांत त्यांच्या चलनात 100 रुपयांच्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीचं चलन नाही. त्यामुळे भारतात दोन हजारांच्या नोटेचं काय औचित्य राहणार आहे, त्यामुळे मी भारत सरकारला विनंती करतो की, टप्प्याटप्प्याने 2000 रूपयांची नोट मागे घेण्यात यावी.
Join Our WhatsApp Community