राज्य सरकारचा मराठी भाषेचा आग्रह केवळ कागदावरच, ‘या’ विभागाचे संकेतस्थळं मात्र इंग्रजीत

राज्याच्या ऊर्जा विभागाच्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती, या तिन्ही कंपन्याचे संकेतस्थळ Website सर्वात आधी इंग्रजीत सुरू होते.

215
राज्य सरकारचा मराठी भाषेचा आग्रह केवळ कागदावरच, 'या' विभागाचे संकेतस्थळं मात्र इंग्रजीत

ऊर्जा विभागातील Department of Energy तिन्ही कंपन्याचा थेट संबंध हा सर्वात आधी सर्वसामान्य मराठी नागरिकांशी येतो. असे असूनही या विभागाशी संबंधित कंपन्यांची सर्व संकेतस्थळे इंग्रजी भाषेत आहेत. त्या संकेतस्थळावरील मराठी भाषांतर अर्धवट स्वरूपात आहे. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा विषय महत्त्वाचा ठरतो.

(हेही वाचा – LPG Gas Price : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल, घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर)

संकेतस्थळ इंग्रजीत

राज्याच्या ऊर्जा विभागाच्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती, या तिन्ही कंपन्याचे संकेतस्थळ Website सर्वात आधी इंग्रजीत सुरू होते. महावितरण व महापारेषण या कंपन्याच्या संकेतस्थळात मराठी पर्याय आहे. मात्र वीजनिर्मिती व्यवसायात असलेल्या महानिर्मिती कंपनीचे संकेतस्थळ संपूर्ण इंग्रजी भाषेत आहे. तर महापारेषणचे संकेतस्थळ पूर्णपणे मराठीत उपलब्ध आहे. परंतु महावितारणाचे संकेतस्थळ अर्धवट मराठी स्वरूपात आहे.

हेही पहा

महावितरणाच्या संकेतस्थळावर इंग्रजी व मराठी असे दोन्ही पर्याय आहेत. त्यापैकी कोणताही निवडता येतो. परंतु मराठीतील संकेतस्थळ अर्ध स्वरूपात आहे.

एमएमआरडीएचे मराठी अर्धवट

महामुंबई क्षेत्राचा विकास करणाऱ्या मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील मराठीदेखील अर्ध स्वरूपात आहे. हे संकेतस्थळ सुरूवातीला मराठीत उघडते. त्यावर दोन्ही भाषा आहेत. मात्र प्रामुख्याने निविदा, विविध अहवाल हे मराठी भाषेचा पर्याय निवडल्यानंतरही इंग्रजीत दिसतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.