कुपरेज उद्यानात बसला आहात का? मग बाजूला ठेवलेल्या पुस्तकांची पानेही चाळा!

उद्यान विभागामार्फत सामाजिक दायित्‍व (CSR) च्‍या माध्‍यमातून कुलाबा स्थित कूपरेज बँडस्‍टँड उद्यान येथे मोफत वाचनालय सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍या हस्‍ते सोमवारी २ मे रोजी करण्यात आले. येत्या काही दिवसात महानगरपालिकेच्‍या २४ विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २४ उद्यानांमध्‍ये वाचनालय या माध्‍यमातून उभारण्‍याचा महानगरपालिकेचा मानस आहे. कुपरेज उद्यानात बसला असाल, बाजूला ठेवलेल्या पुस्तकांची पानेही चाळा म्हणजे तुमची वाचन क्षमता पुन्हा वाढवता येईल आणि आपल्या ज्ञानातही भर पडेल.

धावपळीचे जीवन आल्‍हाददायी करण्‍याचा प्रयत्‍न

मुंबई महानगरपालिकेच्‍या उद्यान विभागामार्फत विविध उद्यानांमध्‍ये सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून विविध उपक्रम राबविले जातात. ‘Morning Raga’, ‘[email protected]’ यांसारखे विविध सांगितिक कार्यक्रम आणि इतर सुखद उपक्रम राबवून मुंबईकरांचे धावपळीचे जीवन आल्‍हाददायी करण्‍याचा प्रयत्‍न उद्यान विभागाकडून नेहमीच होत राहिलेला आहे. याच धर्तीवर बोलताना विविध उद्यानांमध्‍ये सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून मोफत वाचनालयाच्‍या संकल्‍पनेची सुरूवात कूपरेज उद्यानापासून केली गेली असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – नवाब मलिक तुरूंगातून जेजे रूग्णालयाच्या ICU मध्ये दाखल, प्रकृती स्थिर)

सोशल मीडिया आणि मोबाईलच्‍या दुनियेत हरविलेल्‍या नव्‍या पिढीला वाचनामध्‍ये रस निर्माण करून एक समृद्ध समाज निर्मितीचा आमचा प्रयत्‍न आहे. या वाचनालयांमध्‍ये निसर्गविषयक, विविध महापुरूषांच्‍या जीवन चरित्रविषयक, इतिहासविषयक, वृक्ष-फुले-फळांविषयक, आरोग्‍यविषयक, चांगल्‍या जीवन शैलीविषयक त्‍याचप्रमाणे लहानग्‍यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्‍हावा, या हेतूने विविध बोधपर गोष्‍टी तसेच खेळ आणि व्‍यायामाविषयी आवड निर्माण व्‍हावी म्‍हणून त्‍या संदर्भातील पुस्‍तकेही या वाचनालयांमध्‍ये वाचनास उपलब्‍ध करून देण्‍यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here