अग्निशमन दलातील यंत्रांचा मित्र सेवानिवृत्त

141

मुंबईतील आगींवर अत्याधुनिक यंत्राचा वापर करत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये रोबोसह ७० मीटर, ८१ मीटर व ९० मीटर उंचीच्या हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म अर्थात शिडी तसेच स्वयंचलित यंत्राचा वापर केला जातो. परंतु आजवर ज्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीमुळेच जवानांना आग विझवण्याच्या कामात हत्तीचे बळ येते, ते अग्निशमन दलातील सर्व यंत्रे लिलया चालवणारे अधिकारीच आता सेवानिवृत्त झाले आहेत. मुंबईत एका बाजुला आगींच्या दुघर्टनांमध्ये वाढ होत असतानाच अशा प्रकारच्या अनुभवी अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीमुळे अग्निशमन दलाची यांत्रिकी बाजुच आता कमजोर झालेली आहे. यामुळे अग्निशमन दलामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली असून ती कशी भरणार, असा प्रश्न आता महापालिकेपुढे निर्माण झालेला आहे.

अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यास सुरुवात

मुंबई अग्निशमन दलातील उपप्रमुख अग्निशमन अधिकारी असलेले राजेंद्र चौधरी हे ३० नोव्हेंबर रोजी ३८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. मेकॅनिकल कम ऑटोमोबाईल इंजिनीअर म्हणून फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेल्या राजेंद्र चौधरी यांनी खऱ्या अर्थाने अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केला. अग्निशमन दलाच्यावतीने खरेदी करण्यात येणारे यंत्र कोणत्या प्रकारची आणि कोणत्या पध्दतीचे असावेत, त्यामध्ये कोणकोणत्या तंत्राचा समावेश असावा याचा बारकाईने अभ्यास करून त्या यंत्राचा वापर अग्निशमन दलामध्ये करण्यासाठी त्यांचा आग्रह असे. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलात त्यांचा यंत्राचे मित्र, असेही बोलले जात असे. उत्तुंग इमारत असो वा कोणत्याही काचेच्या इमारतीला लागलेली आग असो वा कारखान्या किंवा झोपडपट्टयांमध्ये लागलेली आग असो. तिथे प्राधान्याने यंत्राचा वापर करावे लागत असे. परंतु घटनास्थळी राजेंद्र चौधरी हे विमोचन कार्यात सहभागी आहेत, हे पाहिल्यानंतर वर्दीवर असलेल्या प्रत्येक जवानांचा विश्वास वाढलेला असायचा.

(हेही वाचा माहुलच्या पंपिंग स्टेशनच्या जागा अदलाबदलीचा प्रस्ताव चर्चेविना मंजूर)

यंत्रांच्या खरेदीपासून ते हाताळणीपर्यंत सर्व कौशल्य 

१९९३चा बॉम्बस्फोट आणि दंगल असो, २६ नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला असो, २६ जुलै २००५चा महापूर प्रत्येक घटनांमध्ये राजेंद्र चौधरी यांचा सहभाग होता. आजवर झालेल्या प्रत्येक प्रमुख अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचाही चौधरी यांच्यावर विश्वास असायचा. यंत्रांच्या खरेदीपासून ते हाताळणीपर्यंत सर्व कौशल्य असलेले अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे. परंतु त्यांच्या कार्यशाळेत सध्या दोन अभियंते कार्यरत असले तरी चौधरी यांच्याप्रमाणे वर्दी अंगावर चढवून आग विमोचनात सहभागी होण्यासारखे कौशल्य त्यांच्याकडे नाही. त्यामुळे चौधरी यांच्या निवृत्तीमुळे अग्निशमन दलातील सर्व यंत्रांची माहिती असली तरी प्रत्यक्षात वर्दीवर जावून त्याचा वापर करणारेच अधिकारी नसल्याने मुंबई अग्निशमन दलाला भविष्यात आगीच्या घटनांमध्ये विमोचनाचे कार्य करताना मोठ्या संकटातून जावे लागणार असल्याची भीती वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.