उपायुक्त चंदा जाधव यांची पुन्हा एकदा बदली

152

मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदावरून उपायुक्त पदी बढती मिळाल्यानंतर चंदा जाधव यांच्यावर अतिक्रमण निर्मुलन विभागाची जबाबदारी सोपवली. पण तिथून त्यांची बदली परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी केली. परंतु आता तिथूनही त्यांची बदली घनकचरा व्यवस्थापन पदी केली.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त पदी असलेल्या डॉ. संगीता हसनाळे यांच्यावरील जबाबदारी काढून ही जबाबदारी परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे हसनाळे यांच्याकडे कोविड काळामध्ये उपायुक्तपदी बढती सोपवल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपवली होती, परंतु अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

(हेही वाचा रेड लाईट एरियातही ध्वजारोहण; ‘त्या’ घटकांनी दर्शवली उपस्थिती)

घनकचरा व्यवस्थापन पदी बदली केली

चंदा जाधव यांनी उपायुक्त होण्यापूर्वी ए विभागाचे सहायक आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर उपायुक्त पदी त्यांची बढती होताच त्यांना अतिक्रमण निर्मुलन विभागाची जबाबदारी सोपवली होती. या विभागात चंदा जाधव यांनी आपले काम चोखपणे पार पाडत या विभागाच्या कार्यपध्दतीला गती देण्याचे काम केले. परंतु या विभागाचे काम चांगले सुरु असतानाच प्रशासकांनी त्यांची बदली परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी केली. पण या पदावर आपल्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरु असतानाच त्यांची बदली घनकचरा व्यवस्थापन पदी केली.

बालमवार बनले सहआयुक्त

उपायुक्तपदी पाच वर्षांपेक्षा अधिक  सेवा करणाऱ्या विजय बालमवार यांची महापालिकेने सहआयुक्त म्हणून बढती दिली आहे. त्यामुळे उपायुक्त पदावरून सहआयुक्त बनलेल्यांच्या यादीत आता बालमवार यांच्या नावाचा समावेश झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.