ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये 14 जानेवारी 2023 ते 14 मार्च 2023 या कालावधीत संध्याकाळी 6:00ते सकाळी 06.00 या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.
परोपकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी 6.00 ते सकाळी 6.00 या कालावधीत टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल वाहून नेऊन नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्यामुळे 14 जानेवारी 2023 ते 14 मार्च 2023 या काळात डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांनी कळवले आहे.
( हेही वाचा: धक्कादायक: पुण्यातील मुंढव्यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या )
Join Our WhatsApp Community