उत्तर प्रदेश पर्यटन विभागाचे उपसंचालक यांची मुंबईत आत्महत्या

157
उत्तर प्रदेश राज्याच्या पर्यटन विभागाच्या लखनऊ येथील कार्यालयात उपसंचालक विमलेश कुमार बनारसीदास ओदित्य (५९) यांनी मुंबईतील राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना मंगळवार, २१ फेब्रुवारी सकाळी टिळक नगर येथे घडली. कामाच्या ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांची पत्नी रमा औदित्या यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली.
विमलेश कुमार बनारसीदास ओदित्य हे उत्तर प्रदेश राज्याच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक होते, मुंबईतील वर्ल्ड ट्रेण्ड सेंटर या ठिकाणी त्यांचे कार्यालय आहे. मुंबईतील चेंबूर टिळक नगर येथील प्लॉट नंबर २०४ बी विंग तारा गगन हाऊसिंग सोसायटी इमारत क्रमांक ९५ येथे पत्नी रमा औदित्या यांच्यासह राहण्यास होते. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विमलेस यांनी राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विमलेस यांना तात्काळ उपचारासाठी राजवाडी रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून त्यांची पत्नी रमा औदित्या यांचा जबाब नोंदवला असता त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, त्यांचे पती विमलेस यांनी  इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून ते उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागात उपसंचालक पदावर होते, त्यांचे कार्यालय मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये असून २०२२पासून लखनऊ येथील मुख्य कार्यालयात उपसंचालक म्हणून काम करीत होते, त्यांना कामाचा ताण असल्याने व घरापासून दूर राहावे लागत असल्यामुळे  त्यांनी दोन महिन्यापूर्वीच नोकरीचा राजीनामा दिला होता व त्यांना ३१ मार्च पर्यंत काम करण्यास उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने सांगितले होते. कामाच्या ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे पत्नी रमा औदित्य यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.