बंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, महाराष्ट्रातही पडसाद

110

सदाशिवनगर बंगळूर इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून त्यांच्याकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर बेळगाव, कोल्हापूर भागात नागरिकांनी या घटनेविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. बंगळुरूतील घटनेच्या निषेधासाठी बेळगाव शहरात शुक्रवारी धर्मवीर संभाजीराजे चौकात तसेच कोल्हापुरातही तरुणांनी निषेध व्यक्त केला.

बेळगावमध्ये तणाव

या घटनेनंतर परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले असून अनेकांनी धर्मवीर संभाजी चौकामध्ये जमून रस्ते बंद केले. दगडफेकीच्या घटनाही यावेळी समोर आल्या. या घटनेमुळे संपूर्ण बेळगावमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकच्या बंगळुरू येथे घडलेल्या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कोल्हापूर येथे संताप व्यक्त केला. तसेच कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. कर्नाटका काही संघटना आणि समाजकंटक हे जाणून बुजून करत असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून येत आहेत. कोल्हापुरातील कर्नाटक व्यावसायिकांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळ दुकाने बंद करुन या घटनेचा निषेधही केला.

( हेही वाचा : शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब गद्दार! कदमांचा परबांवर हल्लोबोल )

तातडीने अटक करा

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. तसेच गुन्हेगारांना त्वरित अटक करा असे ट्विट करत, शिवसेना नेते आणि सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.