अरेरे… पोटच्या मुलांना जीवंत ठेवण्यासाठी वडिलांना विकावी लागतेय किडनी!

125

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा  केल्यानंतर तिथली आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. सध्या तालिबानची राजधानी काबूलची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. तिथल्या लोकांना दोन वेळची भाकरी मिळावी म्हणून काहीही करावे लागत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अफगाणिस्तानमधील लोकांना जिवंत राहण्यासाठी, आपल्या मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:ची किडनी विकावी लागत आहे. त्यामुळे पूर्वी अफूसारख्या अमली पदार्थांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेला देश आता मानव आणि मानवी अवयवांचा बाजार बनत चालला आहे.

परिस्थितीसमोर हतबल पालक विकतायत आपली मूलं

द मिररच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपले अवयव विकले आहेत. यापूर्वी गरिबी आणि उपासमारीने त्रस्त असलेल्या अनेक पालकांनी आपल्या मुलांना मजबुरीने विकले होते. युरोलॉजिस्ट आणि किडनी प्रत्यारोपण सर्जन डॉ. नसीर अहमद यांनी गेल्या 12 महिन्यांत 85 किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन्स केल्याचा दावा केला आहे.

कामाच्या बदल्यात मिळतात गहू

तालिबान लोकांकडून काम करवून घेऊन त्याच्या मोबदल्यात कामगारांना आता अन्न पुरवणार असल्याचे सांगत आहे.
अफगाणिस्तानातील सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना इतर देशांकडून दान केलेला गहू पगार म्हणून दिला जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाने अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी ३.२ अब्ज पौंडांची मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

बेरोजगारी आणि गरिबीमुळे परिस्थिती बिकट 

 गरिबी आणि बेरोजगारीमुळे काबूलच्या रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. काबूलमधील बहुतेक लोकांकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. विक्रेत्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबासाठी भाकरीचा तुकडा शोधण्यासाठी काहीतरी करावे लागेल. नोकऱ्या नसल्याने त्यांना रस्त्यावर माल विकावा लागत आहे.

( हेही वाचा :मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! राज्यात लागू होणार समान नागरी कायदा )

संपूर्ण अफगाणिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट 

संपूर्ण अफगाणिस्तानात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लोकांना रुग्णालयात उपचारही मिळत नाहीत. एवढेच नाही, तर सामान्य आजारांची औषधेही दुकानात उपलब्ध नाहीत. बाहेरील देशांतून होणारी आयात ठप्प झाल्यामुळे, खाद्यपदार्थांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. दुर्गम भागात लोक वस्तुविनिमय सारख्या जुन्या पद्धतींचा अवलंब करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.