‘टेस्ला’ कारच्या गुंतवणूकीसाठी राज्यांमध्ये चढाओढ, पहा ट्विट!

73

एखाद्या देशाला आपल्या भारतात किंवा आपल्या राज्यात आमंत्रित करण्यात फरक आहे, पण आपला पक्ष वा राज्य इतरांपेक्षा चांगले असल्याचा दावा करुन, इलाॅन मस्क (टेस्ला कारचे मालक) यांचे लक्ष वेधून घेणे, हा केवळ एक पुरावा आहे की, भारतीयांना शिकायच नाहीये, तर केवळ गुरांसारख वागायचंय. हे बोलण्यामागे एक कारण आहे. इलाॅन मस्क यांनी आपल्याच राज्यात मॅन्युफॅक्‍चरिंग प्‍लांट उभारावं यासाठी विविध राज्यांतील राजकीय नेते ट्विटरवर अक्षरश: स्पर्धा करत असल्याचंच चित्र आहे.

गुंतवणूकीवरुन स्पर्धा सुरु

टेस्ला कारचे मालक इलाॅन मस्क यांना सध्या भारतात कोणत्याही ऑफरची कमतरता दिसत नाहीये. कारण, भारतातील राज्ये त्यांना आमंत्रित करण्यासाठी आपलं राज्य कसं योग्य आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपण वेगवेगळ्या राज्यातील मंत्र्यांनी केलेले ट्विट पाहूया.

तेलंगणा राज्याचं ट्विट

केटी रामाराव यांनी लिहिले, “हाय इलाॅन, मी भारतातील तेलंगणा राज्याचा उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहे. भारत/तेलंगणामध्ये व्यवसाय स्थापन करण्याच्या आव्हानांसोबत काम करण्यास आम्ही आनंदी आहोत. आमचे राज्य चॅम्पियन आहे. आमचे राज्य शाश्वतता उपक्रम आणि भारतातील उच्च दर्जाचे व्यवसाय केंद्र आहे. असं ट्विट तेलंगणाच्या मंत्र्याने केले आहे.

महाराष्ट्राकडून ऑफर

त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री जयंत आर पाटील यांनी ट्विटरवरुन ट्विट केले की, “इलाॅन मस्क, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. भारतात स्थापन होण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ. आम्‍ही तुम्‍हाला तुमचा मॅन्युफॅक्‍चरिंग प्‍लांट महाराष्ट्रात स्‍थापित करण्‍यासाठी आमंत्रित करतो.”असं ट्विट पाटील यांनी केले आहे.

या दोन राज्यांव्यतिरिक्त पश्चिम बंगाल सरकारनेही टेस्लाला कारखाना सुरू करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पश्चिम बंगालचे मंत्री मोहम्मद गुलाम रब्बानी यांनी शनिवारी मस्कच्या ट्विटला उत्तर दिले.

त्यानंतर पंजाबमधूनही इलाॅन मस्क याला कारखाना उभारण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करत, इलेक्ट्रीक आणि बॅटरी इंडस्ट्री उभारण्यासाठी पंजाबमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.

( हेही वाचा :कोरोनादरम्यान ‘या’ राज्यांत सर्वाधिक बालकांचं हरवलं छत्र )

सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न

सध्या इलाॅन मस्क सोशल मिडीयाचा वापर करुन, भारत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, भारतात टेस्ला कार लाॅंच करण्यासाठी सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे इलाॅन मस्कला सध्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. टेस्लाने गेल्या वर्षी भारतातील इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती. अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला भारतात प्रथम इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले होते, त्यानंतरच आम्ही करात सवलत देण्याचा विचार करु, असं स्पष्ट सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.