राजकारणात असूनही समाजकार्यासाठी जीवन वाहिले! रणजीत सावरकरांकडून योगेश म्हस्के यांचे कौतुक! 

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत म्हस्के यांनी शेकडो रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत मिळवून दिली. त्यानिमिताने त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याच्या उद्देशाने रणजीत सावरकर यांनी नाशिक येथील नरेश म्हस्के यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

68

योगेश म्हस्के राजकारणात असले, तरी त्यांनी त्यांचे जीवन समाजकार्याला वाहिले आहे, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी डॉ. श्रीकांत फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक नरेश म्हस्के यांच्या कार्याचे कौतुक केले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत म्हस्के यांनी शेकडो रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत मिळवून दिली. त्यानिमिताने त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याच्या उद्देशाने रणजीत सावरकर यांनी नाशिक येथील नरेश म्हस्के यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, शिवसेना उत्तर नागपूरचे संपर्क प्रमुख आणि स्मारकाचे अस्थायी विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, ‘फर्जंद’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हेही उपस्थित होते.

(हेही वाचा : तुमचं शहर बुडणार आहे… नासाने दिला धोक्याचा इशारा)

कोरोना रुग्णांना अडीच कोटींहून अधिक आर्थिक लाभ मिळवून दिला!

योगेश म्हस्के यांनी राजकारणातील संपर्काचा वापर समाजकार्यासाठी केला. कोरोना काळात नाशिक जिल्हा अतिशय वाईट स्थितीत होता. अशा वेळी योगेश म्हस्के यांनी कोरोना सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना विविध स्वरूपाची मदत मिळवून दिली. रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय स्वरूपात अडीच कोटीहून अधिक रकमेचा लाभ रुग्णांना मिळवून दिला. योगेश म्हस्के हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ते मुलांसाठी संस्कारवर्ग चालवतात, त्याचबरोबर लहान मुलांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवता यावे, यासाठीही विशेष प्रयत्न करतात, त्यांच्या सर्व उपक्रमांना आमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा आहे, असेही रणजीत सावरकर म्हणाले.

कोरोना काळात देवदूत!

याप्रसंगी ‘फर्जंद’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले कि, देशासह महाराष्ट्रावर कोरोनाचे मोठे संकट आले. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यावर हे संकट अधिक गडद होते. त्यावेळी योगेश म्हस्के यांनी कोरोना काळात रुग्णांसाठी अविरत मदत कार्य केले, त्यामुळे ते कोरोना काळात देवदूत ठरले आहेत. कोरोना काळात त्यांनी रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत मिळवून दिली, त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असेही लांजेकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.