राज्यात कोरोना व्हायरसचा धोका कमी झाला असल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू होती. मात्र दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट या सगळ्याला पुन्हा ब्रेक लावतोय की काय अशी स्थिती सध्या झालेली दिसतेय. कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये घट होत असताना ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा धोका वाढल्याने भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओमिक्रॉन या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटने जगभरातील कित्येक देशांना पुन्हा चिंतेत टाकले आहे. दरम्यान, अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉ. रवी गोडसे यांनी सकारात्मक बातमी दिली आहे. ती म्हणजे, ओमिक्रॉन असूनही, भारतात तिसरी लाट येणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
Despite Omicron, there will be no 3rd wave in India!
— DrRavi (@DrGodseRavi1) November 29, 2021
(हेही वाचा – ओमिक्रोन विषाणू ओळखायला सोपा, पण आवरायला कठीण!)
व्हेरिएंटसोबत दोन हात करण्यास भारतीय सक्षम
डॉ. रवी गोडसे यांनी असेही सांगितलं की, कोरोनाच्या विविध व्हेरिएंटसोबत दोन हात करण्यात भारतीय सक्षम आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट संदर्भातही अशीच माहिती समोर आली होती की, डेल्टा आधीच्या व्हायरसपेक्षा अधिक धोकादायक आहे. मात्र, डेल्टाचा भारतात जास्त संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले नाही. जगभरात डेल्टाचा कहर सुरू असतानाही भारतात डेल्टा व्हेरियंटपेक्षा कोरोनाचे रूग्ण अधिक होते.
भारतीयांमधील अँटीबॉडीज ठरणार प्रभावी!
कोरोनाचे अनेक व्हेरियंट आले आणि गेले. मात्र, भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकार क्षमता असल्याने भारतीयांना ओमिक्रोन व्हेरिएंटबाबत भीती वाटण्याचे कारण नाही. शिवाय, भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण झाले असल्याने या कोरोना लसीमुळे भारतीयांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत, ज्या भारतीयांना ओमिक्रोन व्हेरिएंटशी लढण्यात प्रभावी ठरतील, असेही डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community