…तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार

129

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त होत चाललेल्या कृषी आंदोलनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करत शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत असल्याचेही ते म्हणाले. मोदींनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत असे जाहीर केले, तसेच शेतकऱ्यांनी सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन थांबवावे आणि घरी परतावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले. असे असतानाही शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन मागे घेणार नाही, असे संकेत दिले.

…म्हणून आंदोलन मागे घेणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य केली आहे. मोदींनी तिन्ही कृषी कायदे मागे घेणार असल्याचे जाहीर केले. शेतकरी आंदोलन लगेच मागे घेणार नाही, असे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. राकेश टिकैत यांनी असेही स्पष्ट केले आहे की, किमान आधारभूत किमती सोबतच सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित इतर समस्यांवरही चर्चा केली पाहिजे.

(हेही वाचा- देशातील ‘ते’ तिन्ही कृषी कायदे रद्द करणार! पंतप्रधानांची मोठी घोषणा)

मोदींकडून पुन्हा एकदा कृषी कायद्यांचे समर्थन 

गेल्या एक वर्षांपासून शहाजहानपूर, टिकरी, सिंघू आणि गाझीपूर या दिल्ली-एनसीआरच्या चार सीमेवर देशातील अनेक राज्यांतील शेतकरी तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांनी आपले आंदोलन २६ नोव्हेंबर २०२० पासून सुरू ठेवले होते. यादरम्यान त्यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या जनतेला संबोधित केले आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले, असे म्हणत मोदींनी यावेळी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचे समर्थन केल्याचे दिसले. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.