लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई! 

149

नुकतेच रायगड किल्ल्यावर हिरवी चादर आणि हिरवा रंग देवून मदार बनवण्याचा प्रयत्न खासदार संभाजी राजे यांनी हाणून पाडला. हा प्रकार नुसता रायगड किल्ल्यापुरता मर्यादित नाही, तर राज्यातील बहुतांश शिवकालीन गड – किल्ल्यांचे इस्लामीकरण करून एक प्रकारे शिव पराक्रमाची विटंबना सुरू आहे. पुण्यातील लोहगडाचेही असेच इस्लामीकरण करण्यात आले असून धक्कादायक बाब म्हणजे राज्यात सर्वत्र जमावबंदी आहे, रात्रीची संचारबंदी आहे, उत्सव, जत्रांवर बंदी असताना लोहगडावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या आशीर्वादाने लोहगडावर १७ जानेवारीला उरूस भरवला जाणार आहे. त्यामुळे सध्या परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अशाच प्रकारे श्रीमलंग गडावर असे अतिक्रमण झाले त्याच मार्गावर लोहगडाचीही वाटचाल सुरु आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Lohagad

परवानगी नाही, तरी… 

लोहगड किल्ला हे प्राचीन स्मारक असून त्यावर कोणत्याही प्रकारे धार्मिक कार्यक्रमाला अनुमती नाही. ‘प्राचीन स्मारक आणि त्याच्या परिसरात उरूस शरीफ साजरा करण्यासाठी अनुमती देण्यात येऊ नये’, असा स्पष्ट आदेश १३ डिसेंबर २०१८ या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून मुंबई विभागाच्या अधीक्षकांना देण्यात आला आहे. हा आदेश डावलून प्रतिवषी लोहगडावर उरूस साजरा केला जात आहे. यंदाच्या वर्षीही या गडावर मंडप उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिस आणि पुरातत्व विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी या गडाची पाहणी केली तरीही त्या मंडपावर कारवाई करण्याची हिमंत दाखवलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावले असताना, तसेच या गडावर कोणताही उरूस साजरा करण्यास पुरातत्व विभागाची परवानगी नसतानाही सगळ्यांना धाब्यावर बसवून या गडावर उरुसाची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात गड-किल्ल्यांवर जमण्यास बंदी करण्यात आली आहे.

(हेही वाचा वीर सावरकरांनी ३ दशकांपूर्वीच फाळणीविषयी केलेले सतर्क! उदय माहुरकर का म्हणाले सावरकर होते द्रष्टा पुरुष?)

याआधी अवैध उरूस साजरा, गैरप्रकार… 

हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून १७ आणि १८ जानेवारी या दिवशी लोहगडावर उरुस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची पत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात १७ आणि १८ जानेवारी हे दोन्ही दिवस गडावर साजर्‍या करण्यात येणार्‍या धार्मिक कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून लोहगडावर अवैधपणे उरुस साजरा केला जात आहे. यापूर्वी उरुस साजरा करतांना गडावर दारू पिणे, मांस शिजवणे, मलमूत्र विसर्जित करून घाण करणे आदी प्रकार झाले आहेत. याविषयीचे जुने व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहेत.

New Project 6

राष्ट्रवादीचे आमदार शेळके यांचा पाठिंबा?

मागील काही वर्षांपासून लोहगडावर अवैधपणे मंडपाची उभारणी करून हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून उरुस साजरा करण्यात येत आहे. याविषयी ‘गड-किल्ले सुरक्षा दला’चे विश्‍वनाथ जावलिकर स्थानिक शिवप्रेमींनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे, तसेच पुरातत्व विभागाच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात लेखी तक्रार केली आहे. तथापि आतापर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे आता लोहगडावर दरवर्षी उरुस साजरा करण्याची परंपरा चालू झाली असून हा अपप्रकार पोलिस आणि पुरातत्व अधिकारी यांच्या मूकसंमंतीने चालू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. उरुसाच्या निमंत्रणपत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांचे नाव छापण्यात आले आहे.

letter

 

(हेही वाचा वीर सावरकर यांचे विचार चिरंतन, कालातीत! प्रवीण दीक्षितांनी सावरकर युगाचा घेतला मागोवा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.