Devaney Pawanar : शुद्ध तामिळ चळवळीचे कट्टर समर्थक भारतीय महान विद्वान देवनेय पवनार

Devaney Pawanar : शुद्ध तामिळ चळवळीचे कट्टर समर्थक भारतीय महान विद्वान देवनेय पवनार

146
Devaney Pawanar : शुद्ध तामिळ चळवळीचे कट्टर समर्थक भारतीय महान विद्वान देवनेय पवनार
Devaney Pawanar : शुद्ध तामिळ चळवळीचे कट्टर समर्थक भारतीय महान विद्वान देवनेय पवनार

देवनेय पवनार हे एक भारतीय विद्वान होते. त्यांनी तमिळ भाषा आणि साहित्यावर ३५ हून अधिक संशोधन खंड लिहिले आहेत. तसेच ते “शुद्ध तामिळ चळवळीचे” कट्टर समर्थक होते आणि त्यांनी मुख्यत्वे तामिळ शब्दांचे मुळ आणि नॉस्ट्रॅटिक अभ्यासाशी त्यांचे संबंध शोधण्यासाठी व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश प्रकल्प सुरू केला. (Devaney Pawanar)

(हेही वाचा – Creative Academy : विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रिएटिव्ह अकॅडमीवर चालवणार बुलडोझर; आमदार महेश लांडगे यांची चेतावणी)

अण्णामलाई विद्यापीठात द्रविड विभागाचे प्रमुख

पवनार यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९०३ रोजी तामिळनाडू येथे झाला. ते १९४४ ते १९५६ दरम्यान म्युनिसिपल कॉलेज (Municipal College), सेलम येथे तामिळ भाषेचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. १९५६ ते १९६१ पर्यंत ते अण्णामलाई विद्यापीठात द्रविड विभागाचे प्रमुख होते. सरकारने १९५९ मध्ये स्थापन केलेल्या तमिळ विकास आणि संशोधन परिषदेचे ते सदस्य होते, ज्यावर तमिळ शाळा आणि महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

१९७४ पासून ते तमिळ व्युत्पत्तिविषयक प्रकल्पाचे संचालक झाले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय तमिळ लीगच्या (International Tamil League) तामिळनाडूचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. पवनार यांचे म्हणणे असे होते की तामिळ भाषा ही सर्वात नैसर्गिक आहे आणि ही जगतील सर्वात जुनी भाषा आहे आणि या भाषेतून इतर भाषांतले शब्द निर्माण झाले. त्याचबरोबर त्यांनी संगीतकार म्हणूनही काम केले. १९७९ मध्ये तामिळनाडू राज्य सरकारने त्यांना ’सेंथामिळ सेल्वर’ (Senthamil Selvar) ही पदवी बहाल केली होती आणि त्यांना द्रविड मोझी नूल नायरू (Dravid Mozi Nool Nayru) म्हणजे ’द्रविडी भाषांचा सूर्य’ असेही संबोधले गेले होते. (Devaney Pawanar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.