शहरात आता एक असे उद्यान तयार झाले आहे. जिथे गेल्यावर बारामतीकरांना मनसोक्त सुगंध मनात साठवून ठेवता येणार आहे. बारामतीचे नगरसेवक जय पाटील यांनी तब्बल बारा लाख रुपये खर्चून बारामतीतील पहिली सुगंधी फुलांची बाग विकसित केली आहे. अनंत फ्लॉवर गार्डन असे याचे नामकरण केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत जय पाटील यांना शाबासकीची थाप दिली.
( हेही वाचा: तुम्हाला Location दाखवणारे GPS आहे तरी काय? )
व्यायामासाठी जीमही
बारामतीतील माऊली नगरमधील सरस्वती विद्या मंदिरासमोर 15 गुंठे मोकळी जागा होती. या जागेमध्ये जय पाटील यांनी सुगंधी फुलांची झाडे लावण्याचा संकल्प करत त्याला कुंपण करुन झाडे आणून ती व्यवस्थित लावली. इतके करुन ते थांबले नाहीत, तर मोकळ्या जागेत त्यांनी या बागेत सकाळी व संध्याकाळी येणा-यांना व्यायाम करता यावा यासाठी ओपन जिमही तयार केली आहे.