राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह राज्यातील ४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. याशिवाय ३१ पोलिसांना शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
( हेही वाचा : National Tourism Day : स्वस्तात फिरण्यासाठी IRCTC चे भन्नाट टूर पॅकेज! हिंदू धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी विशेष सहली )
राष्ट्रपती पोलीस पदक कोणाला मिळाले?
राज्यातील ४ अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक संभाजी देशमुख आणि ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा यात समावेश आहे. याशिवाय ३१ अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपद आणि ३९ जणांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत.
देशातील विविध राज्यांमधील एकूण ९०१ पोलिसांना पदके जाहीर करण्यात आली आहेत. ५ जानेवारी २०२३ रोजी देवेन भारती यांनी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Join Our WhatsApp Community