महाकाल मंदिरामध्ये दररोज श्रद्धाभावातून सुमारे एक लाख भाविक दाखल होतात. परंतु आपल्या हलगर्जीपणामुळे ज्योतिर्लिंगाची झीज पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळेच आता गर्भगृह प्रवेशबंदीचा सल्ला आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (जीएसआय) समितीने दिला आहे. ही समिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झाली आहे. २०१९ पासून ही समिती दरवर्षी महाकाल परिसराचे निरीक्षण करून सर्वोच्च न्यायालयात अहवाल सोपवते.
डिसेंबर २०२२ मध्ये समितीने निरीक्षण केले. त्यानुसार २०२१ मध्ये दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यातही शिवलिंगावर भस्म, भाविकांची स्पर्शपूजा व घर्षणामुळे पिंडीची खूप हानी झाली. घर्षण, भस्म, स्पर्शपूजेमुळे पिंडीवर छिद्रे तयार झाली आहेत. ती वाढू लागली आहेत, असे एप्रिल २०२१ च्या अहवालात समितीने म्हटले होते.
(हेही वाचा – Jagnnath Yatra : पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात; लाखो भाविकांची मांदियाळी)
यात जिवाणू वाढतात आणि मग पिंडीची आणखी झीज होते. शिवलिंगाचा आकार ५० वर्षांत हळूहळू घटला आहे. सोबतच शिवलिंगावर ठिकठिकाणी त्याच्या खुणा पूर्वीपेक्षा जास्त खोल असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे दुर्लक्ष केल्यामुळे ओंकारेश्वराच्या मूळ ज्योतिर्लिंगाचेही ३० टक्के नुकसान झाले होते. समितीच्या अहवालात ६ प्रमुख मुद्दे, यामुळे हानी रोखणे शक्यजलाभिषेकाच्या पाण्याच्या गुणवत्तेचे रोज परीक्षण करावे. भस्माच्या पीएचचे प्रमाणही पाहावे. मुंडमाला-सर्पकरणाचे वजन कमी करावे. शिवलिंगावर जास्त वजन ठेवणे टाळावे.
भस्म आरतीदरम्यान पिंड पूर्णपणे झाकावी. नंतर आरओ वॉटरने २-३ वेळा धुतले पाहिजे. सध्या कपड्यातून राख पडते. शिवलिंगाच्या परिसरातील ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट आहे. खूप जास्त पाण्याने अभिषेक करणेही टाळावे. कारण यातूनही नुकसान होऊ शकते.शिवलिंगावर दूध, पाणी, इतर सामग्रीचा वापर जरूर करा. परंतु तो कमीत कमी असावा.गर्भगृहात भाविकांना प्रवेशबंदी केली जावी. प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग वेगवेगळे असावेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community