आता विमानात दिसणार ‘तृतीयपंथी’ वैमानिक! DGCA ने जारी केली नवी गाईडलाईन, ‘या’ आहेत अटी

120

कित्येकदा व्यक्ती तृतीयपंथी असल्याने तिच्याकड समाज वेगळ्या नजरेने बघतो. तृतीयपंथी असल्याने त्या व्यक्तीकडून रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जातात किंवा त्या असल्या तरी त्याकरता मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र सध्या ही परिस्थिती बदलताना दिसतेय, कारण आता तृतीयपंथी व्यक्तींनाही संधीचं आकाश भरारी घेण्यासाठी मोकळं करून दिल्याचे दिसतेय. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी आता वैमानिक होण्याची संधी निर्माण केली आहे. याबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालय म्हणजेच DGCA कडून नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. त्यामुळे लवकरच तृतीयपंथी आकाशात उंच भरारी घेताना दिसणार आहे.

(हेही वाचा – DGCA Rule: आता या प्रवाशांना विमानाने प्रवास करता येणार नाही! काय आहे डीजीसीएचे आदेश?)

अशा आहे DGCA च्या गाईडलाईन्स

DGCA कडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार, पात्रता पूर्ण करणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना वैमानिक बनता येणार आहे. देशातील साधारण ५ लाख तृतीयपंथी व्यक्तींपैकी इच्छुकांना DGCA ने घातलेल्या अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येणार आहे. अमेरिका, इंग्लंड सारख्या देशात काही वर्षांपूर्वीच तृतीयपंथी व्यक्तीचा वैमानिक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु भारतात काही कायदेशीर बाबींमुळे हा मुद्दा मागे पडला होता. मात्र आता DGCA च्या परवानगीनंतर हा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे अटी आणि नियम

  • वैमानिक पदाची परीक्षा पास होणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीला त्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता तसेच कौशल्याच्या आधारावर वैमानिकाचा परवाना मिळणार आहे.
  • लिंगपरिवर्तनाचे उपचार घेऊन ज्यांना ५ वर्ष पूर्ण झाले आहेत, अशा व्यक्तिंना परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे.
  • या अटींची पूर्तता केलेल्यांना परवाना देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.