SpiceJet मध्ये 18 दिवसांत 8 वेळा बिघाड, DGCA ने बजावली कारणे दाखवा नोटीस

173

स्पाइसजेटच्या विमानांमध्ये सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडाच्या घटनांनंतर बुधवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या 18 दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या 8 घटनांनंतर DGCA (Directorate General of Civil Aviation) ने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री-पवार यांची झाली भेट? एकनाथ शिंदेंनीच केले स्पष्ट)

DGCAने म्हटले आहे की स्पाईसजेट एअरलाईन विमान नियम, 1937 अंतर्गत सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरली आहे. मंगळवारी दिल्ली-दुबई विमानाचे इंधन इंडिकेटर बिघाडल्याने पाकिस्तानमधील कराचीत आपत्कालीन लँडिग करण्यात आले होते. त्याच दिवशी कांडला- मुंबई विमान मुंबईत विंजशील्डच्या मध्यभागी तडा गेल्याने विमान उतरवण्यात आले. मंगळवारी दोन घटना समोर आल्यानंतर गेल्या 18 दिवसात स्पाईसजेटच्या विमानातील तांत्रिक बिघाडाच्या 8 घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या सर्व घटनांची गांभीर्याने चौकशी सुरू असल्याचे DGCA ने सांगितले आहे.

स्पाईसजेटच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सप्टेंबर 2021 मध्ये केलेल्या ऑडिटमध्ये असे आढळून आले की स्पेअर पार्ट्स पुरवठादारांना नियमितपणे पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे स्पेअरची कमतरता असल्याची माहिती समोर येत आहे. स्पाईसजेटला बजावलेल्या DGCA नोटीसवर नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. यासह त्यांनी ट्विटमध्ये असेही म्हटले, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे. सुरक्षेला बाधा आणणाऱ्या लहान चूकीची देखील सखोल चौकशी करून ती दुरूस्त केली जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.