तुम्ही विमानाने प्रवास करताय? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची. DGCA ने म्हणजे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवासाबाबत नवीन आदेश जारी केला आहे, ज्या अंतर्गत काही लोकांना विमानाने प्रवास करता येणार नाही. यासह DGCA ने हवाई प्रवासाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या नवीन आदेशानुसार, कोणताही दिव्यांग व्यक्ती विमानाने प्रवास करू शकतो की नाही, हे विमान कंपन्या ठरवणार नाहीत, तर आता ते डॉक्टर ठरवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – जालन्यात स्टिल कारखानदारांच्या घरात सापडले 390 कोटींचे घबाड, 32 किलो सोनं!)
या लोकांना प्रवास करता येणार नाही
नव्या नियमात डीजीसीएने असे म्हटले की, दिव्यांग व्यक्ती विमानाने प्रवास करण्यास योग्य आहे की नाही, हे विमान कंपनी नाही तर डॉक्टर ठरवतील. डॉक्टरांनी एखाद्या प्रवाशाला अनफिट असल्याचे सांगितले तर तो प्रवासी विमानाने प्रवास करू शकणार नाही. विमान कंपन्यांनी प्रवाशांशी गैरवर्तन करून त्यांना विमानात चढण्यापासून रोखल्याच्या अनेक घटनादेखील घडल्या आहेत.
…तरच विमान कंपन्या देणार प्रवेश
विमान कंपन्यांचे नियामक असलेल्या डीजीसीएने विमान कंपन्यांना दिलेल्या या नव्या आदेशात असे म्हटले की, ‘विमान कंपनी अपंगत्वाच्या आधारावर कोणत्याही प्रवाशाला प्रवास करण्यास नकार देणार नाही. विमान प्रवासादरम्यान प्रवाशाची तब्येत बिघडू शकते असे एखाद्या विमान कंपनीला वाटत असेल, तर त्या प्रवाशाची डॉक्टरांकडून तपासणी करावी लागणार आहे. यानंतर प्रवासी विमान प्रवास करण्यास योग्य आहे की नाही हे फक्त डॉक्टरच सांगतील. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विमान कंपन्या निर्णय घेऊ शकतील. दरम्यान, रांची विमानतळावरील विमान कंपनीने एका अपंग मुलाला विमानात बसण्यास नकार दिल्याची घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community