धक-धक गर्ल Madhuri Dixit झाली ५७ वर्षांची! जाणून घेऊया तिचा जीवन प्रवास

अभ्यासाव्यतिरिक्त माधुरी लहानपणापासूनच नाटक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घ्यायची. नृत्य आणि अभिनयाची आवड तिला लहानपणापासूनच होती.

199
धक-धक गर्ल Madhuri Dixit झाली ५७ वर्षांची! जाणून घेऊया तिचा जीवन प्रवास
माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit) हे नाव आपल्यासाठी परके नाही. माधुरी ही हिंदी चित्रपट सृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने सत्तरपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचं सौंदर्य, नृत्य आणि दमदार अभिनयासाठी समीक्षकांनी नेहमीच तिचं कौतुक केलं आहे. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या पुरुषप्रधान काळातही माधुरीने आपल्या कलेच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःची अशी एक भक्कम जागा निर्माण केली. (Madhuri Dixit)
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही १९९० पासून ते २००० सालच्या सुरुवातीच्या काळापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिलेब्रिटींपैकी एक होती. २०१२ साली फॉर्ब्स मॅगझीनने प्रकाशित केलेल्या भारताच्या शंभर सिलेब्रिटींच्या यादीमध्ये माधुरी दीक्षित हेही नाव होतं. आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीत सतरा पुरस्कारांसाठी तिला नामांकन मिळालं होतं. त्यांपैकी माधुरीला सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. २००८ साली भारत सरकारने माधुरी दीक्षितला ‘पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. (Madhuri Dixit)
माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) जन्म १५ मे १९६७ साली मुंबईतल्या एका कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचं नाव शंकर दीक्षित आणि आईचं नाव स्नेहलता दीक्षित असं होतं. तिने वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच कथ्थक या भारतीय शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आठ वर्षे तिने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. ती एक प्रोफेशनल कथ्थक डान्सर आहे. (Madhuri Dixit)
माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) तिचं शालेय शिक्षण डिव्हाईन चाईल्ड हायस्कूलमधून पूर्ण केलं. अभ्यासाव्यतिरिक्त माधुरी लहानपणापासूनच नाटक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घ्यायची. नृत्य आणि अभिनयाची आवड तिला लहानपणापासूनच होती. तिला मोठं होऊन मायक्रोबायोलॉजिस्ट व्हायचं होतं. त्यासाठी तिने विलेपार्ले इथल्या साठे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. (Madhuri Dixit)
बीएससीचा एक विषय घेऊन तिने मायक्रोबायोलॉजिचा अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू केल्यानंतर पुढच्या सहा महिन्यातच तिने पूर्णवेळ चित्रपट सृष्टीमध्ये काम करायचं ठरवलं आणि आपल्या कलेच्या जोरावर आजही माधुरी (Madhuri Dixit) वेगवेगळ्या कार्यक्रम आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. (Madhuri Dixit)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.