धारावी सेक्टर -५ मध्ये होऊ घातलेल्या पुनर्विकासाबाबत काळा किल्ला विभागातील नागरिकांनी धारावी सेक्टर – ५ पुनर्विकास कृती समितीतर्फे मंगळवारी २० डिसेंबरला सकाळी ११.०० वाजता काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग, धारावी येथून म्हाडा कार्यालय, बांद्रा येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी मोर्चा आयोजित केला होता.
या मोर्चात धारावी विभागातील काळा किल्ला, काजरोळकर चाळ, संग्राम नगर, शिव गंगा सोसायटी, क्रांती नगर परिसर तसेच रेवा फोर्ट कॉलनी झोपडपट्टीमधील महिला पुरुष झोपडीधारक उपस्थित होते. सर्व झोपडीधारकांच्यावतीने मागण्यांचे निवेदन यावेळी म्हाडाकडे सुपूर्द करण्यात आले. या मोर्चात शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत, उपविभाग समन्वयक गणेश खाडे, समाजसेविका राजेश्री खाडे सहभागी होत्या.
( हेही वाचा: तालिबानी सरकारचा निर्णय; अफगाणिस्तानात महिलांसाठीचे विद्यापीठ होणार बंद )
…तर अतिआक्रमक मोर्चा काढणार
धारावी सेक्टर -५ मधील झोपडपट्टीधारकांकडून म्हाडाला 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 2 जानेवारीला अतिआक्रमक मोर्चा काढला जाणार आहे. म्हाडाकडून झोपडपट्टीधारकांना 3 ते 4 दिवसांत उत्तर देऊ, तसेच लवकरच काम सुरु करु, असे आश्वासन देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community