धरम सिंह देओल म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीचे लाडके अभिनेते धर्मेंद्र. (Dharmendra) त्यांना बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाते. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९७ मध्ये त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील साहनेवाल गावात झाला. त्यांचे वडिलांचे नाव किशन सिंह देओल आणि आईचे नाव सतवंत कौर. ते जाट शीख आहेत. धर्मेंद्र (Dharmendra) फिल्मफेअर मासिकाच्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित न्यू टॅलेंट पुरस्काराचे विजेते होते आणि पुरस्कार विजेते असल्याने, चित्रपटात काम करण्यासाठी पंजाबहून मुंबईला गेले, पण चित्रपट कधीच निर्माण झाला नाही.
(हेही वाचा-Pune: प्रसिद्ध ‘पुना गेस्ट हाऊस’ला मिळाला टपाल तिकिटावर झळकण्याचा बहुमान)
तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांचे प्रयत्न सुरुच होते. पुढे त्यांनी 1960 मध्ये अर्जुन हिंगोरानीच्या ’दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पदार्पण केले. १९६१ मध्ये बॉय फ्रेंड या चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आणि १९६० ते १९६७ दरम्यान अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी रोमँटिक भूमिका साकारल्या. त्यानंतर त्यांनी अनेक रोमॅंटिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी नूतनसोबत सूरत और सीरत, बंदिनी, दिल ने फिर याद किया, या चित्रपटांमध्ये काम केले. हेमा मालिनी यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप गाजली. या जोडीने राजा जानी, सीता और गीता, शराफत, नया जमाना, पत्थर और पायल, तुम हसीन मैं जवान, जुगनू, दोस्त, चाचा भतीजा, आझाद आणि शोले असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. (Dharmendra) असं म्हटलं जातं की एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीवर त्यांची दहशत होती. उतारवयात त्यांनी भारतीय जनता पार्टीमधून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. बिकानेरमधून ते लोकसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले. २०१७ मध्ये पुण्याच्या यूएसके फाउंडेशनतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१२ मध्ये त्यांना पद्म भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. बॉबी देओल, सनी देओल, इशा देओल ही त्यांची मुलं सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. अतिशय हॅंडसम हीरो आज ८८ वर्षांचा झाला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community