ब्रिटिशांची चालबाजी ओळखणारे महान क्रांतिकारक Dheeran Chinnamalai

226

धीरन चिन्नामलाई (Dheeran Chinnamalai) हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचा जन्म १७ एप्रिल १७५६ साली तामिळनाडू येथील मेलापालयम या ठिकाणी झाला. त्यांनी काली सेना नावाच्या संघटनेसोबत तामिळनाडू येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधातील लढ्यामध्ये भाग घेतला होता. त्यांच्या वडिलांचं नाव रत्नस्वामी आणि आईचं नाव पेरियाथा असं होतं. चिन्नामलाई यांचं खरं नाव तिर्थगिरी असं होतं. लहानपणीच तिर्थगिरी यांनी शिवंदरैयार यांच्याकडून कुस्ती, नेमबाजी, तलवारबाजी आणि मार्शल आर्ट्स शिकून घेतले.

त्या काळी कोंगु राष्ट्र हे म्हैसूर शासनाच्या अधिपत्याखाली होतं. कोंगु राष्ट्रातील जमा होणारा सारा कर म्हैसूर शासनाकडे जमा होत होता. परदेशातून भारतात व्यापार करायला आलेली ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतात आपले पाय पसरत होती. व्यापार सोडून शासन करण्याच्या हेतूने पाय उचलू लागली होती. हे चिन्नामलाई (Dheeran Chinnamalai) यांच्या लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. त्यांना ते थांबवायचं होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.

(हेही वाचा Shri Shahu Chhatrapati : श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याकडे किती कोटींची संपत्ती?)

स्वातंत्र्य सेनान्यांना जंगलामध्ये युद्ध प्रशिक्षण दिले  

टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर चिन्नामलाई (Dheeran Chinnamalai) हे कोंगु येथे आले. तिथे त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध करण्याची तयारी सुरू केली. त्यांनी स्वातंत्र्य सेनान्यांना जंगलामध्ये युद्ध करण्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तसेच हत्यारे बनवली, तोफखानाही तयार केला. १८०१ ते १८०४ सालादरम्यान त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध कडवी झुंज दिली आणि त्यात ते जिंकलेही. ब्रिटिशांना कळून चुकलं की चिन्नामलाई (Dheeran Chinnamalai) यांना युद्धात मात देता येणार नाही. म्हणून ब्रिटिशांनी शक्कल लढवली आणि चिन्नामलाई यांना अटक केली. त्यानंतर खोटे परीक्षण करून त्यांना, त्यांच्या भावांना आणि त्यांच्या साथीदारांना १८०५ साली फाशी देण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.