देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन; छोटा शकीलचा निकटवर्तीय अटकेत 

169
देशातील सर्वात मोठ्या ‘डीएचएफएल’ बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डची पाळेमुळे समोर आली आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार छोटा शकील याच्या निकटवर्तीयाला या घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. अजय नावंदर असे अटक करण्यात आलेल्या अंडरवर्ल्डशी संबंधित व्यवसायिकाचे नाव आहे. नावंदरला मुंबईतून सीबीआयने अटक केली आली आहे.
व्यवसायिक असलेल्या अजय नावंदर याने रेबिका दिवाणमार्फत बँक घोटाळ्यातील कोट्यवधी रुपये अंडरवर्ल्डमधील लोकांना दिल्याचा संशय सीबीआयला आहे. रेबिका दिवाण ही मुख्य आरोपी कपिल वाधवानची निकटवर्तीय असल्याचे समजते. ३४ हजार कोटींच्या या बँक घोटाळ्यातील पैसा हा अंडरवर्ल्डमध्ये वापरण्यात आला असावा, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली असून, या अनुषंगाने सीबीआय तपास करत आहे.
सीबीआयने अटक केलेल्या अजय नावंदर याचे अनेक बड्या लोकांशी जवळचे संबंध असून, त्यात बॉलिवूड अभिनेते, राजकीय बडे नेते, बडे व्यवसायिक आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असल्यामुळे घोटाळ्यातील पैशाशी त्यांचा काही संबंध आहे का?  याचा तपास सीबीआय करत आहे. अजय  नावंदर यांच्या अटकेमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, आपल्याला सीबीआय चौकशीला बोलावते की काय? अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.