धुळ्यात भीषण अपघात! केमिकल टॅंकरने अनेक वाहनांना उडवले

धुळ्यात एका केमिकल टॅंकर चालकाने अनेक वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये इतर वाहन चालक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. टॅंकर गुजरातकडे जात असताना त्याने अनेक वाहनांना धडक दिली. मद्यपी टॅंकर चालक राजेंद्र सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळ्यात संतोषी माता चौक ते फाशीदपूर या दरम्यान ही घटना घडली आहे. यात किती लोक जखमी झाले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

( हेही वाचा : बेस्टच्या २६ आगारांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी ३३० चार्जिंग स्टेशन )

धुळ्यामध्ये संतोषी माता चौक ते फाशीदपूर दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकरने अनेक वाहनांना धडक दिली. गुजरातच्या दिशेने निघालेल्या या टॅंकरमध्ये केमिकल होते. केमिकलने भरलेल्या याच टॅंकरने अनेक वाहनांना धडक दिली. या केमिकल टॅंकरचा वाहनचालक राजेंद्र नशेत होता.

धुळ्यात ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने धुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here