हिरे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते Laljibhai Patel

124
लालजीभाई पटेल (Laljibhai Patel) हे एक भारतीय हिरे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. पटेल हे धर्मानंदन डायमंड्स प्रा. लि. चे अध्यक्ष आहेत. लालजीभाईंच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे धर्मानंदन डायमंड्स ग्रुप ऑफ कंपनीज ही जागतिक स्तरावर नावाजलेली हिरे उत्पादन कंपनी झाली आहे. लालजीभाईंचा जन्म भारतातील गुजरात राज्यातील बोटाड जिल्ह्यातील उगामेडी या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. माध्यमिक शिक्षणासाठी ते राजकोटला गेले त्यांनी गुरुकुल, राजकोट येथे शिक्षण घेतले.
लालजीभाईंचा विवाह निर्मलाबेन यांच्याशी झाला आणि या जोडप्याला हितेश पटेल आणि पियुष पटेल हे दोन मुले आहेत. दोन्ही मुले आता धर्मानंदन डायमंड्स ही कंपनी सांभाळत आहेत. १९७४-७५ दरम्यान ते व्यवसायासाठी सुरत शहरात आले आणि त्यांनी हिर्‍याचा व्यापार केला. त्यांनी या उद्योगाचे सखोल ज्ञान मिळवले. १९८५ मध्ये तुलसीभाई गोटी ह्या त्यांच्या बालपणीच्या मित्रासोबत त्यांनी श्रीजी जेम्स नावाचे छोटे हिरे उत्पादन युनिट स्थापन केले.
कठोर परिश्रमातून कंपनीचा विकास झाला आणि १९९३ मध्ये या कंपनीचे नाव धर्मानंदन डायमंड्स ठेवण्यात आले. लालजीभाईंच्या नेतृत्वाखाली, व्यवसाय वाढतच गेला. लालजीभाई पटेल यांची वैयक्तिक संपत्ती $४८० दशलक्ष असून ते भारतातील शीर्ष १० श्रीमंत ज्वेलर्सपैकी एक आहेत. २०१५ मध्ये रिटेल ज्वेलर्स इंडियाने लक्झरी वस्तूंच्या उद्योगातील त्यांच्या योगदानाबद्दल आणि गुजरात राज्यात केलेल्या समाजिक सुधारणेसाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.