डियान फॉसी (Dian Fossey) ह्या एक अमेरिकन प्रायमेटोलॉजिस्ट आणि संरक्षणवादी होत्या. त्यांनी माउंटेन गोरीलाचा विस्तृत अभ्यास केला होता. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३२ रोजी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे झाला. त्या सहा वर्षांच्या असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. नंतर त्यांच्या आईने उद्योगपती रिचर्ड प्राइसशी पुनर्विवाह केला. त्या त्यांच्या आईकडेच लहानाच्या मोठ्या झाल्या.
त्यांनी Rwanda च्या पर्वतीय जंगलात माउंटेन गोरीलाचा अभ्यास करायला सुरुवात केली. गोरीलास इन द मिस्ट हे त्यांचं पुस्तकही खूप गाजलं. या पुस्तकात त्यांनी गोरीला विषयीचा त्यांचा वैज्ञानिक अभ्यास मांडला आहे. हे पुस्तक नवोदित अभ्यासकांसाठी खूपच उपयुक्त ठरत आहे. १९८८ रोजी या पुस्तकावर याच नावाचा चित्रपट देखील प्रदर्शित झाला.
(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशाची मिरवणूक; ठिकठिकाणी मंगल वाद्य, रामनामाचा गजर, भव्य शोभायात्रेचे आयोजन )
त्यांच्या संशोधनामुळे गोरीलांची लोकसंख्या जी घसरत होती, ती कमी झाली. त्या Trimates च्या सदस्य देखील होत्या. त्यांच्यासोबत चिंपांझींचा अभ्यास करणारे जेन गुडॉल आणि बिरुटे गाल्डिकास हेदेखील सदस्य होते. फॉसीने Rwanda मध्ये २० वर्षे घालवली. वन्य जीवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
त्याचबरोबर वन्य जीवांची शिकार आणि पर्यटन यासदेखील त्यांनी विरोध केला. गोरीलांविषयी त्यांच्या मनात एक वेगळी भावना होती, मात्र त्यांचा हा प्रवास अचानक थांबला. १९८५ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना नक्की कुणी मारले हे रहस्य त्यांच्यासोबत गेले, मात्र त्यांच्या संशोधनामुळे लोकांमध्ये जागृती झाली, एवढे मात्र खरे!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community