जगातील पहिल्या परिचारिका माहितीहेत का? ज्यांचे राणी व्हिक्टोरियानेही पत्र लिहून मानले होते आभार

95

प्रत्येक रुग्णासाठी डॉक्टर हा देव असतो. परंतु रुग्णांची देखभाल करण्यात परिचारिकांचे (Nurse) मोठे योगदान असते. १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेन्स नाईटॅंगल या जगातील पहिल्या परिचारिका म्हणून ओळखल्या जातात. फ्लोरेन्स यांचा जन्म १२ मे १८२० साली झाला. १२ मे हा फ्लोरेन्स यांचा जन्मदिवस असल्यामुळे दरवर्षी या दिवशी जागतिक परिचारिका दिवस (International Nurse day) साजरा केला जातो. नर्सिंगच्या दुर्लक्षित क्षेत्राला १९ व्या शतकात खऱ्या अर्थाने ओळख, प्रसिद्धी मिळवून देण्यात फ्लोरेन्स नाईटॅंगल यांचा मोठा वाटा आहे. क्रिमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी दिवसरात्र देखभाल केली. यामुळे त्या सर्वत्र प्रचलित झाल्या व यामुळे राणी व्हिक्टोरियानेही स्वत: त्यांचे पत्र लिहून आभार मानले होते.

( हेही वाचा : मुंबईत २४ तास धावणाऱ्या लोकलची ‘अशी’ होते देखभाल )

फ्लोरेन्स नाईटॅंगल यांच्याविषयी

लोकांची सेवा करण्याच्या उद्दिष्टाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी फ्लोरेन्स यांनी परिचारिका होण्याचे ठरवले. त्यांचा जन्म मूळचा इटलीचा परंतु काही काळाने त्या लंडनमध्ये स्थिरावल्या. १८५१ साली फ्लोरेन्स यांनी नर्सिंगचे शिक्षण जर्मनी येथे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर १८५३ मध्ये फ्लोरेन्स नाईटॅंगल यांनी लंडनमध्ये महिलांसाठी विशेष रुग्णालय उघडले.

New Project 3 7

१८५४ मध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्की विरुद्ध रशिया या देशांमध्ये क्रिमियन युद्ध सुरू झाले. रशियाच्या दक्षिणेस असलेल्या क्रिमियामध्ये लढण्यासाठी ब्रिटिश सैन्य पाठवण्यात आले होते. तेथील सैनिकांचा जखमी होऊन थंडी, भूक आणि रोगराईने मृत्यू होत असल्याची माहिती आली. या भागात मदतीची गरज होती. युद्ध मंत्री सिडनी हर्बर्ट फ्लॉरेन्स यांना ओळखत होते. यानंतर परिचारिकांच्या एका गटाला क्रिमियामध्ये पाठवण्यात आले. परिचारिकांनी क्रिमियामध्ये जाऊन स्वयंपाकघराची व्यवस्था केली, जखमी सैनिकांची योग्य ती काळजी घेतली. जखमांवर मलमपट्टी करणे, योग्य देखभाल करणे याकडे लक्ष देण्यात आले. यामुळे अनेक सैनिकांचा जीव वाचला.

फ्लोरेन्स नाईटॅंगल यांना लेडी विथ लॅम्प का म्हणतात?

फ्लॉरेन्स नाईटॅंगल यांनी क्रिमियामध्ये रुग्णांची रात्रंदिवस काळजी घेतली. ज्या सैनिकांना लिहिता येत नाही, त्यांच्या वतीनेही फ्लोरेन्स नाईटॅंगल यांनी त्यांच्या घरच्यांना पत्र लिहिले. रात्री रुग्णांची देखभाल करण्यासाठी त्या कंदिल घेऊन जात होत्या, यामुळे सैनिक त्यांना ‘लेडी विथ लॅम्प’ म्हणू लागले.

New Project 2 8

१८५६ मध्ये क्रिमियन युद्धभूमीवरून फ्लोरेन्स परतल्या तेव्हा त्यांचे नाव सर्वत्र प्रचलित झाले होते. त्यांच्याविषयीच्या कथा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या, स्वत: राणी व्हिक्टोरियाने पत्र लिहून त्यांचे आभार मानले. सप्टेंबर १८५६ मध्ये राणी व्हिक्टोरिया व फ्लोरेन्स यांची भेट झाली. यानंतर १८६० मध्ये लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयात, नाईटॅंगल ट्रेनिंग स्कूल फॉर नर्सेस उघडण्यात आले.
13 ऑगस्ट 1919 रोजी फ्लोरेन्स नाईटॅंगल यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ, त्यांचा वाढदिवस परिचारिका दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. तसेच नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटॅंगल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 

New Project 4 6

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.