दिलीप कुमार चक्रवर्ती हे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत, तसेच केंब्रिज विद्यापीठात दक्षिण आशियाई पुरातत्वशास्त्राचे प्रोफेसर एमेरिटस आहेत आणि मॅकडोनाल्ड इन्स्टिट्यूट फॉर आर्किओलॉजिकल रिसर्च, केंब्रिज विद्यापीठात वरिष्ठ फेलो आहेत. भारतातील लोखंडाचा प्रारंभिक वापर आणि पूर्व भारतातील पुरातत्वशास्त्रावरील अभ्यासासाठी ते ओळखले जातात.
चक्रवर्ती यांचा जन्म १७ एप्रिल १९४१ रोजी कोलकोता येथे झाला. दिलीप के चक्रवर्ती हे केंब्रिज विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहासाच्या क्षेत्रात प्राध्यापकपद भूषवणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी १९६५ ते १९७७ या काळात कोलकाता विद्यापीठात पुरातत्वशास्त्राचे लेक्चरर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.
१९९० मध्ये त्यांची केंब्रिज विद्यापीठात दक्षिण आशियाई पुरातत्वशास्त्राच्या अध्यापनाच्या पदावर नियुक्ती झाली आणि २००८ मध्ये निवृत्तीपूर्वी त्यांना प्राध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांनी व्हिजिटिंग फेलोशिप, शिष्यवृत्ती, अध्यापनाच्या नियुक्त्याही घेतल्या आहेत आणि त्यांना केंब्रिज, एडिनबर्ग, तेहरान, न्यूयॉर्क, पॅरिस, जहांगीर नगर (बांगलादेश) आणि आर्मिडेल (ऑस्ट्रेलिया) येथे अनुदान मिळाले.
‘दक्षिण आशियाई पुरातत्वशास्त्राला युरो-अमेरिकन जगाच्या घडामोडींची नक्कल करण्याची गरज नाही, तर त्यांनी स्वतःच्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे’ असा युक्तिवाद त्यांनी केला होता.डॉ. दिलीप चक्रवर्ती यांनी २०१३ मध्ये इन्फोसिस पारितोषिकासाठी ज्युरी म्हणूनही काम केले आहे. त्यांनी सुमारे २९ पुस्तके लिहिली आहेत आणि सुमारे डझनहून अधिक पुस्तके संपादित/सह-संपादित केली आहेत. सध्या ते विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या दिल्लीस्थित थिंक टँकमध्ये प्रतिष्ठित फेलो आहेत, जिथे ते प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अकरा खंडांच्या VIF मालिकेचे संपादक देखील आहेत.
Join Our WhatsApp Community