साकीनाका बलात्कार प्रकरणः नराधमाला सुनावली फाशीची शिक्षा

179

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणात आता न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाकडून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे पीडितेला योग्य तो न्याय मिळाला असल्याचे म्हटले जात आहे.

न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबईताली साकीनाका परिसरात एका महिलेवर अमानुषपणे बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करणा-या नराधमाला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मोहन चौहान असे या आरोपीचे नाव आहे. सप्टेंबर 2021 मध्ये ही घटना घडली असून, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला. 2 जून रोजी दिंडोशी सत्र न्यायालयाकडून आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

साकीनाका येथे राहणाऱ्या एका महिलेवर १० सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोत बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवून तिला जखमी करण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास ती गंभीर अवस्थेत तेथील सुरक्षारक्षकाला दिसली. नंतर सुरक्षारक्षकाने मुंबईच्या मुख्य नियंत्रण कक्ष येथे फोन करून कळवले. साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला टेम्पोसह राजवाडी रुग्णालयात आणले. राजावाडी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी क्षणाचा विलंब करता गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला होता. अवघ्या काही तासांतच आरोपी मोहन चौहान (४८) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.