सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग व इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट (आयडीएसटी) यांच्या एकत्रित प्रयत्नातून विद्यापीठात ‘पीजी डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमात हे विषय हाताळता येणार
या अभ्यासक्रमासाठी 28 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या एकवर्षीय पद्व्युत्तर पदविका अभ्यासक्रमात संरक्षण क्षेत्रातील सर्व मोठ्या तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांची रचना, विकास आणि उत्पादन यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच शस्त्रास्त्र, दारूगोळा, क्षेपणास्त्र प्रणाली, नौदल जहाज, जमिनी व समुद्रातील खाणी, पूल रचना, संवाद प्रणाली, अवकाशशास्त्र प्रणाली आदी विषय अभ्यासता येणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या या नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थांसाठी नवे क्षीतिज खुले होणार आहे. या निमित्ताने विद्यार्थी संरक्षणाच्या विषयी असलेल्या विविध विषयांचा अभ्यास करू शकणार आहेत. तसेच यामुळे विद्यार्थांना या क्षेत्राची ओळख होणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थांना या क्षेत्रात रुची निर्माण होणार असून याचा फायदा मात्र देशाच्या संरक्षणालाही लाभ होणार आहे.
Join Our WhatsApp Community