SBI ग्राहकांना दिलासा! Electric Vehicle खरेदी करताय? मग ही बातमी वाचा

98

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI आपल्या ग्राहकांच्या हिताचा विचार करून नेहमीच त्यांना सतर्क करत असते. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. यामुळे SBI दिलासा मिळणार आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ग्रीन कार योजना तयार केली असून त्याअंतर्गत इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना कर्जावर ०.२० टक्क्यांची सूट मिळणार आहे. यासह ग्राहकांना प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागणार नाही.

कमी व्याज दराने कर्ज होणार उपलब्ध

तसेच बँकेकडून इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२० टक्के कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कर्ज ग्राहकांना ८ वर्षांमध्ये परत करावे लागेल. बँकेच्या योजेनेंतर्गत ग्राहकांना इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी १०० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच प्रोसेसिंग चार्ज देण्याची आवश्यकता नाही. एसबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना बँक ७.२५ ते ७.६० टक्के दराने कर्ज मिळत आहे.

(हेही वाचा – SBI च्या ‘या’ सेवांसाठी तुम्ही पैसे तर देत नाही ना? ATM मधून फ्रीमध्ये करा ही कामे)

इतर कोणत्या बँकेकडून मिळतेय सूट

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात मोठी सूट देण्यात येत आहे.

  • त्यामध्ये इंडसइंड बँक ७ टक्के
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया ७.२५ टक्के
  • पंजाब नॅशनल बँक ७.०५ टक्के
  • युनियन बँक ऑफ इंडिया ७.०३ टक्के
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.