‘दिशा सालियनचा मृत्यू हा’…; CBI च्या अहवालातून महत्त्वाची माहिती उघड

मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन 28 वर्षीय दिशा पडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती होता, असा निष्कर्ष सीबीआयने तपासानंतर काढला आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील भाड्याच्या घरात सापडण्याच्या पाच दिवसांपूर्वीच दिशाचा मृत्यू झाला .

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत तोल जाऊन पडल्याने दिशाचा मृत्यू झाला आहे. सीबीआय तपास संस्थेने दिशाच्या मृत्यूबद्दल माहिती अहवाल हा स्वतंत्रपणे दाखल केला नसला तरी, बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

( हेही वाचा: महाराष्ट्र – कर्नाटक प्रश्न अधिक तापणार; कर्नाटकची नवी कुरापत, ‘या’ जिल्ह्यावर केला दावा )

…आणि तीचा तोल गेला

दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. दिशा आणि सुशांत सिंह राजपूत दोन्ही मृत्यूंचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता, कारण दिशा आणि सुशांत यांनी काही काळ एकत्र काम केले होते. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले की, दिशाने तिच्या वाढदिवसानिमित्त घरी गेट-टूगेदरचे आयोजन केले होते. त्याच रात्री दारूच्या नशेत असलेल्या दिशाचा तोल गेला आणि ती फ्लॅटच्या पॅरापेटवरुन घसरली, असे या अहवालात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here