शिर्डीतील साईबाबा मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळाबाबत मंगळवारी औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. शिर्डीमधील साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला असून हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय येत्या दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे, अशा सूचनाही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – सिकंदराबादमध्ये भीषण अग्नितांडव! इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना आगीचा भडका, ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी)

सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी या संदर्भातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. दरम्यान, आता नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहेत. अवघ्या एका वर्षात या मंडळात पायउतार व्हावे लागले आहे. तर महाविकास आघाडी सरकारने नेमलेले हे विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याने हा आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आघाडी सरकारने १६ सप्टेंबर २०२१ रोजी १२ सदस्यांचे नवीन विशस्त मंडळ नेमले. यावेळी आशुतोष काळे अध्यक्ष आणि अॅड. जगदीश सावंत उपाध्यक्ष होते. या समितीत ९ सदस्य आणि एक पदसिद्ध होता. हे विश्वस्त मंडळ साईबाबा संस्थान कायदा २००४ विश्वस्त नेमणूक नियम २०१३ आणि उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन न करता अस्तित्वात आले आहे. त्यांची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here