डिस्नेचे अनेक कार्टून भरपूर लोकप्रियता मिळवून गेले. असे हे कार्टून लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकासाठीच खास ठरले. काळ बदलला, पिढ्याही बदलल्या, लहान मंडळी मोठी झाली, मोठी वयोवृद्ध. पण, कार्टूनवरील आणि त्यातही डिस्नेवरील कार्टूनवर असणारं प्रेम काही कमी झालं नाही. या कार्टून्सच्या (Cartoons) गर्दीतलं एक नाव म्हणजे मिकी माऊस आणि त्याच्यासोबत दिसणारी मिनी. 2023 च्या शेवटच्या दिवशी 95 वर्षे जुन्या कॉपीराइटची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. (Disney Mickey mouse)
वॉल्ट डिस्नेच्या मिकी माऊस या प्रतिष्ठित पात्राने सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला आहे. स्टीम बोटव्हिल (steamboat willie) या 1928 च्या लघुपटातील मिकी आणि मिनी माऊसच्या प्रतिमा 1 जानेवारी 2024 रोजी अमेरिकेत सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध झाला आहे. ( Disney Mickey mouse)
जवळपास ९५ वर्षांपासून डिस्नेच्या सोबत असणारा हा मिकी आणि मिनी आता मात्र डिस्नेपासून दुरावणार असून इथून पुढं डिस्नेचा त्यांच्यावर कोणताही हक्क राहणार नाही steamboat willie या १९२८ मधील लघुपटामध्ये मिकी आणि मिनी पाहायला मिळाले होते. हा तोच क्षण होता जिथून नशीब खऱ्या अर्थानं फळफळल आणि सिनेमा जगतात एक नवा अध्याय सुरु झाला. आणि आर्थिकदृष्ट्याही डिस्नेला सम्रुद्ध बनवलं आहे.
(हेही वाचा : Ind vs SA 2nd Test : रोहित शर्माला हवी संघातील तरुण खेळाडूंची साथ )
सार्वजनिक क्षेत्र दिन
कॉपीराइटची मुदत संपणे आणि कामांचा सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी सार्वजनिक डोमेन दिन साजरा केला जातो. 1928 पासूनच्या कलाकृती मूळतः 2004 मध्ये कॉपीराइट-मुक्त होणार होत्या. डिस्नेचा त्यांच्यावर असणारा कॉपी राईट कालावधी संपल्यामुळे आता हा मिकी त्याचसोबत असणारी मिनी फक्त डिस्नेची नसून खऱ्या अर्थानं सर्वांचे झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात कार्टूनिस्ट मिकीच्या या जुन्या आणि ९५ वर्षांच्या लूकवर काम करू शकणार आहेत. किंबहुना कोणीही मिकी आणि मिनीच्या कार्टूनचा वापर अगदी मोफत करायला मिळणार आहे.
हेही पहा –