Nashik : महर्षि पंचायतन सिद्धपीठमतर्फे महर्षि पुरस्कार २०२४चे वितरण

238
धर्म, शास्त्र व भारतीय संस्कृतिच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या ज्ञानपरंपरा व कर्मयोगाद्वारे समाज कल्याणासाठी विशेष योगदान दिले अशा ऋषितुल्य व्यक्तींचा अद्वैत सिद्धांताचे जनक जगद्गुरु शंकराचार्य जयंतीनिमित्त वर्ष २०२४ चा पुरस्कार
महामहोपाध्याय, धर्मसम्राट वेदशास्त्रसंपन्न कै. भालचंद्रशास्त्री मुळे, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव पंडित श्रीकांतशास्त्री मुळे गुरूजी व वैदिकसम्राट, महापंडित, घनपाठी मधुरभट्ट जोशी (श्रृति-स्मृति प्रतिष्ठान प्रधानाचार्य)
यांना सम्मान पूर्वक प्रदान करण्यात आला आहे. (Nashik)
या कार्यक्रमाच्या वेळी महंत आचार्य पीठाधीश्वर डाॅ. अनिकेतशास्त्री महाराज, वेदमूर्ती नागेशशास्त्री देशपांडे गुरूजी, व्याकरणाचार्य यतीशचंद्र मिश्र, केंद्रीय विद्यालय, भारत सरकार, साहित्याचार्य बिनोदकुमार चौधरी, संस्कृत विश्वविद्यालय, न्यायमूर्ती वसंत पाटील सर तसेच समाजातील अनेक मान्यवर, धर्मपंडित व भक्त परिवार मोठ्या संख्येत उपस्थित होता.  (Nashik)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.