दिवाळीनिमित्त पश्चिम रेल्वेवर 30 अतिरिक्त विशेष गाड्या

159

दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावी जाणा-या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे 30 उत्सव विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

  • वांद्रे टर्मिनस- गांधीधाम सुपरफास्ट स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी सायंकाळी 7:25 वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी सकाळी 8:40 वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
  • तसेच, गांधीधाम- वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल ही ट्रेन गांधीधामहून दर गुरुवारी रात्री 12:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2:20 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. वांद्रे टर्मिनस- भावनगर स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर शुक्रवारी सकाळी 9:15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भावगरला रात्री 11: 45 वाजता पोहोचले. ही गाडी 21 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.

( हेही वाचा: अजित पवार यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा फेरा? कोणत्या घोटाळ्याचा आरोप? )

  • भावनगर – वांद्रे टर्मिनस स्पेशल भावनगरहून दर गुरवारी दुपारी 2: 50 वाजता सुटेल आणि वांद्रे टर्मिनसला दुस-या दिवशी सकाळी सहा वाजता पोहोचले. ही गाडी 20 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत धावेल. या दोन्ही गाड्यांच्या दहा फे-या असणार आहेत. वांद्रे टर्मिनस- भगत की कोठी स्पेशल वांद्रे टर्मिनसवरुन दर शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. ही गाडी 22 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर 2022 रोजी धावेल.
  • त्याचप्रमाणे भगत की कोठी वांद्रे टर्मिनस स्पेशल प्रत्येक रविवारी भगत की कोठी येथून दुपारी 12:15 वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी सकाळी 11:45 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल आणि वडोदरा – हरिद्वार सुपरफास्ट स्पेशल ही गाडी 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.