पानिपतची लढाई आणि फटाक्यांशी भारतीयांची ओळख; ‘असा’ आहे फटाक्यांचा रंजक इतिहास

149

भारतीयांचा आवडता सण असलेल्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीत दिव्यांची आरास केली जाते. सोबतच फटाके देखील फोडले जातात. अनेक शतकांपासून विविध देशांत सण- उत्सवाच्या काळात फटाके उडवले जातात. मात्र या फटाक्यांशी भारताची ओळख कशी झाली ते  तुम्हाला माहिती आहे का?

….अन् भारताचा फटाक्यांशी परिचय झाला

भारतामध्ये मुघलांबरोबर गनपावडरचे आगमन झाले. पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये गनपावडर आणि तोफांचा वापर करण्यात आला होता. बाबरच्या आधुनिक तोफखान्यासमोर इब्राहिम लोधी टिकू शकला नाही आणि त्यामुळे बाबरने युद्ध जिंकले. पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच 1526 नंतर भारताला गनपावडरची माहिती झाली. तेव्हापासूनच भारतीयांना फटाक्यांची ओळख झाली. अकबराच्या काळात विवाह आणि उत्सवांमध्ये फटाक्यांचा वापर होऊ लागला. ज्या गनपावडरपासून फटाके तयार होत, ती महाग होती. म्हणून फटाके हे प्रतिष्ठेशी जोडले गेले. दीर्घकाळ ते फक्त शाही घराणी आणि श्रीमंत लोकांच्या मनोरंजनाचे साधन होते. पूर्वी लग्नात फटाके वाजवून विविध कला दाखवणारे कलाकार असायचे. त्यांना ‘आतिषबाज’ म्हणत.

 ( हेही वाचा: सावधान! तुम्हाला Free Diwali Gift चा मेसेज आलाय? तर तुमचे अकाऊंटही होईल रिकामे )

आधुनिक फटाके ब्रिटीशांनी आणले

भारतामध्ये आधुनिक फटाके बनवण्याचे काम ब्रिटिश सरकारच्या काळात कलकत्त्यात सुरु झाले. 19 व्या शतकात फटाके बनवण्यासाठी एका लहान मातीच्या भांड्याचा वापर होत असे. त्यात गनपावडर टाकून ते जमिनीवर आपटले, की त्यातून प्रकाश आणि आवाज बाहेर पडायचा. कदाचित त्यामुळेच त्याला फटाका असे नाव मिळाले असावे. तेव्हा त्याला भक्तापू किंवा बंगाल लाइट्स असे म्हणत. त्यामुळेच ब्रिटिश सरकारच्या काळात बंगाल हे उद्योगाचे केंद्र होते. तिथे माचिसची फॅक्टरी होती. त्यामध्ये गनपावडरचा वापर केला जात असे. त्यामुळे तिथेच आधुनिक भारतातला पहिला फटाका कारखाना स्थापन झाला. हा कारखाना नंतर तामिळनाडूमधल्या शिवकाशी येथे ट्रान्सफर झाला. सध्या तामिळनाडूमधील शिवकाशी हे भारतात फटाके बनवणारे सर्वात मोठे केंद्र आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.