दिवाळीत ‘असे’ बना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित

127

दिवाळी हा खूप खास सण आहे. हा सण देशभरात नवीन सुरुवात, आनंद आणि समृद्धीची नवी पहाट घेऊन येतो. भविष्यासाठी आर्थिक नियोजन सुरु करण्यासाठी दिवाळी शुभ मानली जाते. या दिवाळीत स्वत:ला आर्थिक सुरक्षित कसे बनवावे हे जाणून घेऊ.

गुंतवणूक करताना अभ्यास करा

प्रत्येक व्यक्तीच्या व त्याच्या कुटुंबाच्या गरजा व आर्थिक नियोजन वेगळे असते, मात्र त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी केलेला अभ्यास. यावर योग्य पद्धतीने अभ्यास केला तर मोठी रक्कम हातात येते शिवाय आर्थिक फटका कमी होण्यास मदत होते.

आर्थिक अडचणीत मोठा आधार

कोरोना महामारीचा जगभरातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या आणि उत्पन्नात घट झाली. त्यामुळे अनेकांनी गुंतवणूक योजना थांबवल्या. अशा कठीण काळात अनेक कुटुंबांना खात्रीशीर परतावा देणा-या गुंतवणूक योजनेचा आधार मिळाला. ज्यांनी आधीच खात्रीशीर परतावा देणा-या योजनांमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना सुरक्षा मिळाली.

( हेही वाचा: Solar Eclipse: मुंबई,पुण्यासह राज्यातील ‘या’ शहरांत केव्हा आणि किती वेळ दिसणार ग्रहण? वाचा )

आर्थिक अडचणीत मोठा आधार

कोरोना महामारीचा जगभरातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या आणि उत्पन्नात घट झाली. त्यामुळे अनेकांनी गुंतवणूक योजना थांबवल्या. अशा कठीण काळात अनेक कुटुंबांना खात्रीशीर परतावा देणा-या गुंतवणूक योजनेचा आधार मिळाला. ज्यांनी आधीच खात्रीशीर परतावा देणा-या योजनांमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना सुरक्षा मिळाली.

विम्यासोबत खात्रीशीर परतावा

कोरोनाने आर्थिक नियोजनाच्या गरजांना एक वेगळी ओळख दिली. एखाद्या विशिष्ट योजनेत गुंतवणूक करुन गुंतवणूकदारांना विम्यासोबत खात्रीशीर परतावा मिळतो. त्यामुळे महागाईचा सामना करणे सोपे झाले आहे. बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्यात जीवन विमा आणि गुंतवणूकीवर परतावा दोन्ही मिळतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मर्यादित कालावधीसाठी संबंधित विमा पाॅलिसी निवडू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.